तत्त्व एकच, – आत्मतत्व”
“चैतन्यशक्ती”
या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नऊ दिवस, जीवनविद्येच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर असलेली, *”पाचवी माळ”* देवीला अर्पण करू या!
१) समता … २) सभ्यता … ३) सामंजस्य
४) सहिष्णुता …  *५) समाधान …*
६) लवचिकता … ७) नम्रता … ८) कृतज्ञता
                   ९)  विश्वप्रार्थना”
“नवरात्रोत्सव”
पाचवी माळ “समाधान”
*सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः।*
*मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः।।*
                                 श्री. भ. गी. 12.14
मानवी संस्कृतीचा पाचवा महत्वाचा घटक म्हणजे, …
                 “समाधान”
प्रथम मानवी संस्कृती म्हणजे काय? हे पाहू, …
चैतन्यशक्तीचे निसर्गनियम आणि त्यांचे मानवी जीवनावर होणारे बरे वाईट परिणाम लक्षात घेऊन, ….*
*”मानवी कल्याणासाठी” समाजावर जे संस्कार केले जातात त्या संस्कारातून साकार होते तिला “मानवी संस्कृती” असे म्हणतात.*
“माणसाचे समाधान हे खरे धन आहे”.*
पैसा किंवा प्रॉपर्टी माणसाला सुख देऊ शकत नाही. परंतु माणसे पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी खून, मारामाऱ्या करतात. जे पैशाच्या मागे धावत सुटतात ते कधी सुखी होत नाहीत.
ज्याच्याजवळ समाधान आहे त्याला आरोग्य, शांती, यश, कीर्ती प्राप्त होते.*
म्हणून एक म्हण आहे,
*覆 “न मागे त्याची लक्ष्मी होय दासी”*
समाधानी माणसाला सर्व काही प्राप्त होते.
तुम्हाला शंका येईल की, माणसाने महत्त्वाकांक्षी असू नये का?
महत्त्वाकांक्षी असणे व समाधानी असणे ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत.*
समाधानाच्या अधिष्ठानावर अधिक चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्न करणे,* अशी महत्त्वाकांक्षा असली पाहिजे.
जीवनविद्या सांगते, ….
वैयक्तिक महत्त्वाकांक्षा असावी पण परिमित असावी,
पण राष्ट्राच्या अपेक्षेत महत्त्वाकांक्षा *”अमर्याद”* असावी.
आपले राष्ट्र सर्वाथाने, सर्वांगाने, सर्व बाजूंनी सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे ही महत्त्वाकांक्षा प्रत्येक भारतीयाने बाळगावी.*
पण खूप पैसा, प्रॉपर्टी मिळविण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर तो लोभासाठी राष्ट्रद्रोह करण्यापर्यंत मजल मारतो.
जीवनविद्या सांगते, …..
*覆 ”मानवी संस्कृती” मानवाला जीवनात सर्व काही सुख, समाधान द्यायला समर्थ आहे म्हणून मानवी संस्कृतीचा स्वीकार करा.*
(क्रमशः)
     *— सद्गुरू श्री वामनराव पै*
थोर तत्वज्ञानी विचारवंत, दृष्टा समाजसुधारक
                     

error: Content is protected !!