कामशेतच्या पार्वती फर्निचर मध्ये खरेदीवर ५० टक्के डिस्काउंट
होंडा स्पेलन्डर,टिव्ही,फ्रीज ,वाॅशिंग मशीन,फिल्टर बक्षिसांची लयलुट
कामशेत:
कामशेतच्या पार्वती फर्निचर या अद्ययावत दालनात खरेदी करा आणि हिरो होंडा स्पेलन्डर,टिव्ही,फ्रीज ,वाॅशिंग मशीन,फिल्टर या बक्षिसांची लयलूट करा असे आवाहन पार्वती फर्निचरचे सर्वेसर्वा सचिन काटकर आणि समीर काटकर यांनी केले आहे.१५ ऑक्टोबर पासून १५ डिसेंबर अशी दोन महिन्यांची ही ऑफर असणार आहे.
या दोन महिन्याच्या कालावधीत पार्वती फर्निचरच्या  खरेदीवर मोठी सुट देखील मिळणार आहे. पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गालगतच्या भरतशेठ काटकर काॅम्पलेक्स येथे फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचे हे भव्य दालन असून आपल्या स्वागतासाठी ते सज्ज आहे.नवरात्र,दसरा,दिवाळी अशा सणासुदीच्या दिवसात पार्वती फर्निचर यांनी ही खुली ऑफर लाॅच केली आहे. फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीवर मोठी सूट मिळणार आहे.
पार्वती फर्निचर येथे ब्रॅन्डेड कंपनीचे टिव्ही,फ्रीज,वाॅशिंग मशीन,पीठ गिरणी,वाॅटर फिल्टर,मोबाईल या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वर पन्नास टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.फर्निचर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी सोपासेट,कपाट,बेड,टीपाॅय,खुर्ची,ऑफीस फर्निचर खरेदी करता येणार आहे.याही खरेदीवर सुमारे पन्नास टक्के डिस्काउंट आहे.
खास दसरा दिवाळीत खरेदी करणा-यांसाठी ६० हजार रूपये किमतीचा कपाट,बेड,सोपासेट,गादी आणि टीपाॅय असलेला संपूर्ण सेट फक्त ३२ हजारात मिळणार आहे.मावळ तालुक्यांसह जिल्ह्यातील ग्राहकांनी खरेदीसाठी येऊन सणासुदीचा आनंद द्विगुणित करा असे आवाहन सचिन काटकर आणि समीर काटकर यांनी केले आहे.
या ६० दिवसाच्या ऑफर मध्ये १० हजारापेक्षा अधिक रक्कमेची खरेदी करणा-या ग्राहकांना ऑफर कूपन दिले जाणार आहे.या ऑफर कूपनातील भाग्यशाली ग्राहकांना  होंडा स्पेलन्डर,टिव्ही,फ्रीज ,वाॅशिंग मशीन,फिल्टर या वस्तू बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.
ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असलेले पार्वती फर्निचरचे सर्वेसर्वा सचिन काटकर आणि समीर काटकर या दोन भावांची संघर्ष काहणी कौतुकास्पद आहे.नव्याने व्यवसायात उतरू पाहणा-या तरूण पिढीला आशादायक आहे.सचिन आणि समीर यांचे वडील कै.भरतशेठ काटकर पारवडीतील शेतकरी.मात्र त्यांची उठबस कायमच कामशेत बाजार पेठेतील व्यापारी बांधवा सोबत राहिली.
ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत त्यांचा मानसन्मान आणि दबदबा होता.शेतकरीपुत्र असलेले भरतशेठ काटकर यांच्या व्यापाराचे धडे सचिन आणि समीर  मुलांनी गिरवले.एकीकडे या दोन भावांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते.तर दुसरीकडे कामशेत बाजारपेठेत पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत भरतशेठ काटकर यांनी व्यापारासाठी इमारत उभी केली होती.
भरतशेठ काटकर यांचे अकाली जाणे झाले.या दु:खाने होरपळलेल्या सचिन आणि समीर यांना कुटुंबिय,नातेवाईक आणि कामशेत शहरातील व्यापारी बांधवांनी धीर आणि आधार दिला.
दु:खातून सावरून या भावांनी ३५० स्क्वेअर फूट जागेत स्टाईल फरशीचे दुकान सुरू केले.त्या पाठोपाठ हार्डवेअर आणि आता इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरचे शोरूम केले.३५० स्क्वेअर फूट च्या दुकानापासून सुरू झालेला व्यवसाय १० हजार स्क्वेअर फूट आणि चार मजली इमारती पर्यत पोहचला आहे.या जागेत भव्य शोरूम थाटले आहे.
सर्वसामान्य कुटुंबियांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावे आणि क्षणाचे आपणही साक्षीदार असावे याकडे या भावांचा कल आहे.म्हणून बाराही महिने ग्राहकांच्या गर्दीने पार्वती फर्निचरचे दालन गजबजलेले असते.यंदाचा नवरात्र उत्सव, दसरा आणि दिवाळी या सणाचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी पार्वती फर्निचरच्या दालनाला आवश्यक भेट द्या असे आवाहन करण्यात येत आहे.५० टक्क्यांपर्यंत चा डिस्काउंट आणि होंडा स्पेलन्डर,टिव्ही,फ्रीज ,वाॅशिंग मशीन,फिल्टर बक्षिसांच्या लयलुटीचा आनंद घ्या.

error: Content is protected !!