
विजयादशमीच्या मुहूर्तावर मंगलमूर्ती मिसळ व भेळच्या ५० व्या शाखेचे उद्घाटन
आमदार दिलीप मोहिते, सुनिल शेळके, निलेश लंके यांची उपस्थिती
शिक्रापूर:
असंख्य ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी साळमुख फाटयाची सुप्रसिद्ध मंगलमूर्ती मिसळ व भेळ चाकण शिक्रापूर रोड बहुळ येथे मिळणार आहे.मंगलमूर्ती मिसळच्या ५० व्या शाखेचे विजयादशमीच्या मुहूर्तावर उद्घाटन होणार आहे.चाकण शिक्रापूर रस्त्याला हाॅटेल एस.के./ आर.के.शेजारी बहुळला ही ५० वी शाखा होत आहे.
मंगळवार ता.२४ ऑक्टोबर ला सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे.मावळ तालुक्यातील किवळे येथील कशाळ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष रोशन पिंगळे,उद्योजक संदीप देशमुख आणि उद्योजक रोहीदास शिंदे यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे.मंगलमूर्ती मिसळचे संस्थापक शंभुराजे निकम व प्रविण माने यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतकरी पुत्रांनी या व्यवसायात पदार्पण केले आहे.
भालेराव बाबुराव पिंगळे , मंगल भालेराव पिगळे,गोविंद बबन देशमुख, मीनाबाई गोविंद देशमुख,सुनिता अंकुश शिंदे,अंकुश किसन शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
या उद्घाटन प्रसंगी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते,मावळचे आमदार सुनिल शेळके,पारनेरचे आमदार निलेश लंके,पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अतुल देशमुख,भंडारा डोंगर दशमी सोहळा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद उपस्थित राहणार आहे.
या उद्घाटन सोहळयास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन रोशन पिंगळे,संदिप देशमुख,रोहीदास शिंदे,शुभम धुमाळ यांनी केले आहे.
- धर्मासाठी मृत्यूला कवटाळून संभाजीमहाराज अमर झाले: डॉ. केदार फाळके
- जगताना विवेक खूप महत्त्वाचा असतो!’ – प्रा. डाॅ. वर्षा तोडमल
- बीना इंग्लिश स्कूलच्या वतीने काश्मीरमधील मृतांना श्रद्धांजली
- नफ्यातून समाजोपयोगी उपक्रम घेणाऱ्या काळोखे पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : सर्जेराव कांदळकर
- गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुकन्या रितेश चोरघे बिनविरोधडीजे,डॉल्बी आणि ढोलताशांच्या दणदणाटाला फाटा : किर्तन सोहळ्याचे आयोजन




