वडगाव मावळ:
आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील ठाकर, आदिवासी व कातकरी समाजातील कुटुंबांसाठी जातीचे दाखले काढून देणे या सेवा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
वडगाव शहरातील ठाकर, आदिवासी, कातकरी समाजातील अनेक बांधव जातीच्या दाखल्यापासून वंचित आहेत. शैक्षणिक कामांसाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र अत्यावश्यक असते. परंतु ज्यांचे पूर्वज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होते तसेच भूमिहीन होते .
अशा कुटुंबातील नागरिकांना तसेच त्यांच्या पाल्यांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी मानसिक त्रास सहन करावा लागतो व वेळोवेळी दाखला काढण्यासाठी लागणा-या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याने मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून या समाजातील बांधवांना “मदत नव्हे कर्तव्य” या सामाजिक बांधिलकीतून हे सेवाभावी अभियान राबविण्यात आले आहे. वडगाव मधील या समाजातील जवळपास सुमारे दिडशे कुटुंबीयांचे जातीचे दाखले काढण्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी मा ता काॅंग्रेस चे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, जेष्ठ नेते मंगेश ढोरे, मा नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, मा. ता. राष्ट्रवादी वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, जेष्ठ नागरिक सेल तालुकाध्यक्ष विष्णू गुरूजी शिंदे, ऍड अशोक ढमाले, जेष्ठ नागरिक सेल वडगाव अध्यक्ष शांताराम कुडे, जेष्ठ नेते चंदुकाका ढोरे, अर्जुन ढोरे, बारकू ढोरे, श्रीधर ढोरे, सुरेश कुडे, किसनराव वहिले, लक्ष्मण ढोरे, बाळकृष्ण ढोरे, नितीन भाबंळ, चंद्रकांत राऊत, बबनराव कदम, वडगाव राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अतुल वायकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अतुल राऊत,
नगरसेविका पूनम जाधव, मा उपसरपंच विशाल वहिले, सचिन वामन, रुपेश सोनुने, युवा उद्योजक अमर चव्हाण, युवा नेते सचिन कडू, नितीन चव्हाण, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष गणेश पाटोळे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल अध्यक्ष मजहर सय्यद, पप्पू सावले आणि पत्रकार बांधव, मोरया प्रतिष्ठान चे सभासद, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा चेतना ढोरे, उपाध्यक्षा प्रतिक्षा गट आणि संचालिका तसेच वडगाव शहरातील आदिवासी, ठाकर व कातकरी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येत्या दिड महिन्याच्या कालावधीत या समाजातील उपस्थित असलेल्या सर्व कुटुंबीयांना जात प्रमाणपत्र मोफत काढून दिले जाणार आहे. याशिवाय येत्या काळात वडगाव मध्ये ठाकर, आदिवासी व कातकरी समाजातील लहान मुलांसाठी हाॅस्टेल उभारण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी सांगितले.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन