टाकवे बुद्रुक:
येथील शिवशाही मित्र मंडळ हे गणेश उत्सव , शिवजयंती , नवरात्र, दहीहंडी या सणांबरोबर वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करत असते .यावर्षी मंडळाने नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून टाकवे बुद्रुक येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजित केले होते.
यामध्ये अंदर मावळ व टाकवे परिसरातील 160 लोकांनी आपले नेत्र तपासणी करून घेतली व त्यामध्ये ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा व्यक्तींची पुढील उपचाराकरता नारायणगाव येथे रुग्णालयामध्ये उपचाराकरता पाठवले आहे. हा उपक्रम राबवल्याबद्दल टाकवे परिसरातून या मंडळावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हे शिबिर यशस्वी करण्याकरता होण्याकरता टाकवे गावचे माजी उपसरपंच स्वामी जगताप. माजी संचालक दिलिप आंबेकर. मंडळाचे सचिव बाबाजी असवले, संभाजी धामणकर, विष्णू लोंढे. माजी संचालक नंदू असवले. प्रकाश करवंदे. शंकर गुणाट सामाजिक कार्यकर्ते सदाशिव गायकवाड यांनी प्रयत्न केले.
- ‘ परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा
- स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानचा २० एप्रिलला होणार सामुदायिक विवाह सोहळा: अध्यक्षपदी अजय धडवले, कार्याध्यक्षपदी प्रवीण कुडे तर कार्यक्रमप्रमुखपदी संजय दंडेल