पवनानगर:
ब्राम्हणोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अंकुश काळे यांची निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली.यामध्ये अंकुश काळे एकमताने निवड जाहीर करण्यात आली यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी सेवादलाचे उपाध्यक्ष पै.मारुती काळे, ब्राम्हणोली गावच्या पोलिस पाटील वैशाली काळे, ग्रामपंचायत वसंत काळे, बाळासाहेब काळे, माजी अध्यक्ष शंकर काळे,तानजी नवघणे,सोनू काळे, विश्वनाथ काळे, संतोष (भाऊ) दळवी शिवाजी काळे,प्रकाश पवार, गणपत काळे, सुनिल काळे यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक संजय ठाकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. निवडीनंतर अंकुश काळे म्हणाले ,” शाळेच्या विकासासाठी व प्रगतीसाठी सर्वांना बरोबर घेऊन विशेष प्रयत्न केले जातील नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समिती पुढील प्रमाणे
अंकुश रामचंद्र काळे (अध्यक्ष), रेश्मा अर्जुन मोरे (उपाध्यक्ष)
विश्वनाथ शंकर काळे (सदस्य), माणिक शांताराम काळे (सदस्य),सुनिल राघू काळे (सदस्य),मोनिका संदिप काळे (सदस्य),सरिता संतोष दळवी (सदस्य),राजश्री पोपट सुतार (सदस्य),बाळू बाजीराव काळे (सदस्य),रोहिणी हिरामण काळे(सदस्य),पद्मराज सुनिल खेंगरे(सदस्य),वंदना धोंडू गोणते ( सदस्य),संजय शंकर ठाकर (सचिव)
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम