सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ग्रंथ दिंडीचे आयोजन
तळेगाव दाभाडे:
मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातून वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे.
शनिवार दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता ग्रंथ दिंडीचे प्रस्थान होणार आहे. महाविद्यालयापासून तळेगाव येथील सर्वात जुने वाचनालय श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयात ग्रंथदिंडी जाईल. यादरम्यान नागरिकांकडून ग्रंथ संकलन देखील केले जाणार आहे. 
वाचन प्रेरणा दिनानिमित्त 14 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या दरम्यान ग्रंथ दान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीहरी मिसाळ यांनी दिली.
आपल्याकडे असलेल्या चांगल्या स्थितीतील ग्रंथांचा इतरांना वाचनासाठी लाभ मिळावा या शुद्ध हेतूने नागरिकांनी आपल्याकडे असलेले व आपण वाचलेले ग्रंथ, पुस्तके आदर्श विद्यामंदिर संकुलात, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या ग्रंथालयात दान करावेत. असे आवाहन ग्रंथपाल रोहिणी टांकसाळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!