भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती
इंदोरी:
चैतन्य चैरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई),इंदुरी या शाळेत आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी संस्कृत दिन साजरा झाला.
प्रातःकालीन प्रार्थना सभा अतिशय  विशेष होती कारण त्यात प्रत्येक प्रस्तुतिकरण हे संस्कृत भाषेतून करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी सुभाषित श्लोक सादर केले. प्रतिज्ञा पण संस्कृत मध्ये घेतली .

शाळेचे शिक्षक  अमोल धिमधिमे यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व या विषयावर प्रेरणादायी उद्बोधन केले. अमोल  धिमधिमे  म्हणाले,”संस्कृत ही दिव्य भाषा असून तिचे शब्द वैभव  एवढे आहे की साऱ्या भारतीय भाषांमधे तिच्यातीलच शब्द पुष्कळ असलेले आढळतात.

चैतन्य इंटरनेशनल स्कूल
(सीबीएसई),इंदुरी येथे संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारा साठी विशेष शिक्षक नियुक्त केले गेले आहे. ज्यांनी  आपला अमूल्य वेळ आणि ऊर्जा देऊन विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेत निष्णात करण्याची जवाबदारी घेतली आहे.

कार्यक्रमात प्रेरणादायी श्लोक, शिक्षकांची भाषणे, संस्कृत  प्रतिज्ञा, असे उपक्रम पाहायला मिळाले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना संस्कृत भाषे चे महत्व  कळले.कार्यक्रमाची सांगता संपूर्ण विद्यार्थ्यांनी भगवत गीतेच्या श्लोकाचे एका स्वरात आणि भावनेने सुंदर पठण करून केली. संस्थेचे अध्यक्ष  भगवान शेवकर आणि प्राचार्या  जेसी रॉय यांनी संस्कृत दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना आणि कर्मचार्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

error: Content is protected !!