टाकवे बुद्रुक:
येथे महिंद्रा कंपनी कान्हे यांच्या CSR उपक्रमातून माफोई फाऊंडेशन चेन्नई व अथर्व विजय येवले सोशल फाऊंडेशन मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने जनरल ड्युटी असिस्टंट (नर्सिग) या कोर्सच्या बॅचचे उद्घाटन झाले.
महिला सक्षमीकरण व कौशल्य विकसित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.या कोर्सचा मावळातील १०५ महिला व मुलीना लाभ होणार आहे.या कोर्समूळे रोजगार उपलब्ध होईल व सर्वाचेच आरोग्य जोपासण्यात लाभदायक ठरेल .ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकसित होऊन चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
४५ महिलांनी नावनोंदनी केली . सदर प्रशिक्षण संपूर्ण मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाजी झणझणे,सुरेंद्र नेवास्कर , रोहित तिकोणे उपस्थित होते. त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनीनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वाचे आभार मानले .