संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात –
      मानस जाणिजे बोले। वृक्ष जाणिजे फळे।
          भोगे जाणिजे केले। पूर्व जन्मीचे।।

       जन्माला येणे …. की जन्म घेणे ???

                      “कर्माचा महिमा”
याचा अर्थ असा नव्हे की, पूर्व कर्मानुसार ”राजा” म्हणून जो जन्माला येतो किंवा ”रंक” म्हणून जन्माला येतो त्याने कायम राजा किंवा रंक रहावे. *राजा म्हणून जन्माला आल्यानंतर मिळालेल्या अनुकूल परिस्थितीचा सदुपयोग करून व प्रजेचा संतोष संपादन करून राजा म्हणून तसेच पुढे रहावयाचे की तिचा दुरूपयोग करून व प्रजेचा असंतोष ओढवून घेऊन स्वत:ला प्रजेकडून नेस्तनाबूत करून घ्यावयाचे हे त्याच्या प्रस्तुत जन्माच्या गुणकर्मावर अवलंबून आहे.

त्याप्रमाणे *रंक म्हणून जन्माला आल्यानंतर जर प्रतिकूल परिस्थितीशी झगडून व धैर्याने तोंड देऊन तिला योग्य व अनुकूल कलाटणी दिली तर रंकाचा राव होणे कठीण नाही.* सर्वत्र नजर टाकली तर असे आढळून येईल, की *गरीब शेतकऱ्यांच्या किंवा कामगारांच्या पोटी जन्माला आलेली मुले उच्च पदावर आरूढ झालेली असून, पूर्वी जे उच्च पदावर होते ते आज कनिष्ठ परिस्थितीत जीवनाची कालक्रमणा करीत आहेत.

हा काळाचा महिमा नसून “कर्माचा” महिमा आहे, हे ध्यानात येत नाही हीच खेदाची गोष्ट आहे.
या संदर्भात डॉ. मर्फी यांचे खालील विचार बोधप्रद आहेत-
“You can rise victorious over any defeat and realise the cherished desires of your heart through the marvelous power of your sub-conscious mind. Life plays no favourites. God is life and this Life principle is flowing through you this moment.

God loves to express himself as harmony, peace, joy and abundance through you. This is called the will of God or the tendency of Life. If you set up resistance in your mind to the flow of Life, this emotional congestion will get snarled up in your sub-conscious mind and cause all kinds of negative conditions. Every thought or action which is not harmonious whether through ignorance or design will result in discord and limitation of all kinds.

God has nothing to do with unhappy or chaotic conditions in the world. All these conditions are brought about by man’s negative and destructive thinking. It is therefore, silly to blame God for your troubles or sickness”.

                खरा नवजन्म”
एक पाऊल पुढे टाकून असेही म्हणता येईल, की *कोण कुणाच्या पोटी जन्माला येतो याला काहीही महत्त्व नसून जन्माला येताना पूर्वकृत पाप-पुण्याची पुंजी काय आणतो व त्याच्यावर जन्मानंतर काय बरे-वाईट संस्कार होतात, यालाच खरे महत्त्व आहे.* जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत असा आहे, की ….

पूर्वकृत पाप-पुण्याची पुंजी, जन्मानंतर त्याच्यावर होणारे बरे-वाईट संस्कार व त्याच्या हातून घडणारी बरी-वाईट कर्मे यांच्या मिलनातून माणसाला खऱ्या अर्थाने “खरा नवजन्म” प्राप्त होऊन त्याचे पुढील भवितव्य उभारले जाते.

श्रेष्ठ माणसाच्या पोटी जन्माला येऊनसुद्धा कनिष्ठ संस्कार प्राप्त झाल्याने अधोगतीला गेलेले व कनिष्ठ माणसाच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा चांगले संस्कार प्राप्त झाल्याने उन्नती प्राप्त करून घेतलेले, अशी अनेक उदाहरणे दाखविता येतील.
(क्रमशः)
            सद्गुरू श्री वामनराव षै

error: Content is protected !!