प्रत्येक उपाधीतील म्हणजे शरीरातील चैतन्य एकच आहे. जरी त्यावरील संस्कार वेगवेगळे असले तरी, कारण चैतन्याशिवाय कोणतेच शरीर उभे राहू शकणार नाही.*म्हणूनच सर्व उपाधीमाजी गुप्त चैतन्य असे सर्वगत।
ते तत्त्वज्ञ संत स्विकारीती॥
असे म्हटले आहे. आता हे सर्व विस्ताराने पाहू.
जेव्हा काही कारणाने चैतन्यशक्ती शरीराला सोडते तेव्हा त्याला “मृत्यू” असे म्हणतात.* एकदा चैतन्यशक्तीने शरीर सोडले की, शरीराला दिलेले नांव, आडनांव, जात धर्म वगैरे सर्व शरीराबरोबर निघून जाते. *परंतु त्या व्यक्तीला शिक्षण व शिकवण याद्वारे मिळालेले “संस्कार” व “वासना” चैतन्यशक्तीच्या अंगीभूत असणाऱ्या जाणीवेला चिकटून राहतात.
त्याचप्रमाणे *त्या व्यक्तीकडून विचार, उच्चार व आचार यांच्याद्वारे आयुष्यात जी कर्मे घडलेली असतील त्या बऱ्या वाईट कर्मांचे ठसे जाणीवेवर उमटलेले असतात.* म्हणजेच ….
*उपाधीयुक्त व्यक्ती जाते व चैतन्यशक्ती संस्कारयुक्त जाणीवेसह उरते* आणि या संस्कारांना अनुरुप असे दुसरे नवीन शरीर धारण करते. *म्हणूनच आपण पहातो की, एका हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेल्या मुलांमध्ये काही मुले जन्मत:च निरोगी असतात, काही रोगी असतात तर काही शारिरीक वैगुण्य घेऊनच जन्माला येतात.
काही मुले श्रीमंताच्या घरी जन्मतात त्यांना सर्व सुख सुविधा जन्मताच मिळतात. भिकाऱ्याच्या पोटी जन्मलेली मुले सर्व गैरसोयींनी पिडली जातात. काही मुलांना कुटुंबात भरपूर प्रेम मिळते तर काहींना अनाथाश्रमात टाकले जाते.
या प्रकारे पूर्वजन्मांतील कर्मफळांच्या बाकीप्रमाणे प्रत्येक जीव जन्माला येतो.* म्हणून येथे प्रश्न उपस्थित होतो की अशा प्रकारे भिन्न भिन्न संस्कारयुक्त जाणीवेसह असणारी चैतन्यशक्ती, जी वेगवेगळ्या प्रकारची शरीरे (केवळ माणसाचे नाही. तर पशू, पक्षी, जलचर इ.) धारण करते ती सर्वांच्या ठिकाणी एकच कशी असू शकेल?
याचे उत्तर एका उदाहरणाने स्पष्ट करता येईल. एखाद्या घराच्या चार भिंती असतात. एका भिंतीचा
रंग निळा असतो, त्यावर एखादे चित्र लावलेले असते. दुसऱ्या भिंतीचा रंग वेगळा असून त्यावर एखादा वॉल लॅम्प लावलेला असतो. तिसऱ्या भिंतीला मोठी खिडकी असते. त्यावर रंगीत पडदा असतो तर चवथ्या भिंतीवर ट्युब लाईट व खाली दरवाजा असतो. अशा रितीने प्रत्येक भिंतीचे स्वत:चे असे वेगळेपण (individuality) असले तरी शेवटी त्या घराच्या भिंतीच आहेत.
त्याचप्रमाणे शरीर धारण करणारी चैतन्यशक्ती एकच परंतु शरीरातून तिचे होणारे प्रगटीकरण तिच्यावर झालेल्या संस्कारानुरुप वेगवेगळे असते. शरीरातून बाहेर पडणारा आत्मशक्तीचा प्रकाश वेगवेगळा असतो.* म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचे दिसणे, बोलणे, चालणे, पहाणे, विचार करणे, बुद्धीची क्षमता, मनाचे संतुलन, अहंभावाचे प्रमाण पूर्वसंस्कारानुरुप वेगवेगळे असते व *त्यांत नवीन संस्कारांची भर पडतच जाते.
सद्गुरू श्री वामनराव पै
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!
- समर्थ विद्यालयात तब्बल ४२ वर्षांनी भरला इ.१०वीचा वर्ग देश विदेशातून विद्यार्थ्यांची हजेरी
- औद्योगिक नगरीत मतदार जनजागृती अभियान