तालुकास्तरीय बौध्दिक स्पर्धेत पवना शिक्षण संकुल पवनानगरचे घवघवीत यश,तालुक्यात  शाळेला सर्वाधिक ९ पारितोषिके
पवनानगर:
  नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक चिटणीस गुरुवर्य कै.अण्णासाहेब विजापूरकर स्मृती प्रित्यर्थ  आयोजित तालुकास्तरीय बौद्धिक स्पर्धा नुकतेच तळेगाव दाभाडे येथील ॲड पु. वा. परांजपे विद्यालयात संपन्न झाली होती.या स्पर्धेत पवना शिक्षण संकुलातील प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग व कॉलेज विभाग मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन तालुक्यात सर्वाधिक ९ बक्षिसे मिळविण्याचा मान मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे नसतात हे दाखवून दिले .
 
स्पर्धानुसार निकाल खालीलप्रमाणे —-
पद्य पाठांतर स्पर्धा –  ११ वी ते १२ वी गट
१) प्रथम – कु.श्रेया नवनाथ घरदाळे
२) व्दितीय- कु. भालेराव प्रतिक्षा नवनाथ

वक्तृत्व स्पर्धा
३) द्वितीय – कु.सुजाता शंकर पवार
निंबध स्पर्धा – ५ वी ते ७ वी गट
४) द्वितीय- कु.पडवळ सानवी मास्तर
५) द्वितीय- कु.सुतार गौरी तुकाराम

पद्य पाठांतर स्पर्धा- ८ वी ते १० वी गट
६) *द्वितीय* – कु.ठाकर कावेरी नाथा
*पद्य पाठांतर स्पर्धा*- ५ वी ते ७ वी गट
७) *तृतीय* – कु. जाधव स्वराली संतोष
*वक्तृत्व स्पर्धा* ५ वी ते ७ वी गट
*
८) *तृतीय*- सुतार रुद्र संतोष
*पद्य पाठांतर स्पर्धा*-  १ वी ते ४ थी गट
(पवना प्राथमिक विद्या मंदिर)
९) *उत्तेजनार्थ -* कु. ठाकर शिवांजली संतोष

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे  यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनिल बोरूडे , रोशनी मराडे,  सुवर्णा काळडोके, वैशाली वराडे, अमोल जाधव, संजय हुलावळे, ज्योती कोंडभर,चैताली ठाकर, पल्लवी दुश्मन,पोखरकर  यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!