कामशेत:
मावळ तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश काजळे यांच्या पुढाकारातून शासकीय लाभाच्या योजनेची मंजुरी पत्रे देण्यात आली.
संजय गांधी योजना,ज्येष्ठ नागरिक PMPL बस पाससाठी लागणारे ओळखपत्र,अपंग पेन्शन मंजुरी अशा लाभार्थ्यांना पत्रक वाटप करण्यात आले . मावळ तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश काजळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक,महिला उपस्थित होत्या. मावळ तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश काजळे म्हणाले,” मावळ परिसरातील संजय गांधी निराधार योजना,अपंग पेन्शन योजनेसह विविध लाभार्थ्यांनी कामशेत येथील कार्यालयास भेट द्यावी, जेणेकरून सर्व प्रकारची माहिती आणि प्रस्ताव दाखल करण्यास योग्य सहकार्य होईल.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम