वडगाव मावळ:
श्रावण मास सुरू आहे.हर हर महादेवाचा गजर सर्व शिवालयातून घुमतो. भोलेनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन शिवाचे दर्शन भाविक मोठ्या भक्तिभावाने घेत आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगाचे महत्व ही अनन्यसाधारण आहे.

तर अष्टविनायकाची महती सर्वश्रुत आहे,या सर्व पाश्र्वभूमीवर मावळ तालुक्यातील आंबळे आणि मंगरूळ येथील गृहिणींना भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचे आणि अष्टविनायक प्रसिद्ध असलेल्या ओझर आणि लेण्याद्रीच्या गणरायाचं दर्शन घडवून आणले जात आहे.

आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रूपेश घोजगे आणि पीरसाहेब महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रियंका रूपेश घोजगे यांच्या पुढाकारातून हा दर्शन सोहळा घडवून आणला जात आहे. आंबळे येथील पद्मावती आणि मंगरूळच्या पीरसाहेब महाराजांच्या साक्षीने ही यात्रा श्रीक्षेत्र भीमाशंकर आणि लेण्याद्री ओझर कडे रवाना झाली आहे.

श्रावणसरी आणि ऊन पावसाच्या लपडावांत भीमाशंकरचे अभयारण्य अधिक खुलून निघते. निसर्गाचे देखणे रूप न्याहाळत सर्व गृहिणी देवदर्शन सोबत पर्यटनाचा आनंद घेणार आहे.निसर्गाचे हे सौंदर्य जितके वैभवशाली आहे तितके ते रौद्र आणि अनेक पशुपक्ष्यांच्या किलबिलाटाने समृद्ध त्याचाही अनुभव यात्रेतील भाविक अनुभवणार आहे.महादेवाच्या आणि गणरायाच्या चरणी ‘चांद्रयान ३ ‘यशस्वी व्हावे आणि देशाची मान जगात अभिमानाने फुलावी यासाठी साकडे घालणार असल्याचे पीरसाहेब महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रियंका घोजगे यांनी ‘मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन ‘शी बोलताना सांगितले.

पद्मावती मंदिराच्या प्रांगणात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बंडू घोजगे आणि गणेश भांगरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. भगवान पानसरे, नारायण आंभोरे , रामदास आंभोरे , बाबाजी भांगरे , सूर्यंकात भांगरे , संदीप घोजगे , शरद पवार , संतोष देशमुख , सचिन घोजगे , ओंकार आंभोरे , संकेत पानसरे, दिप्तेश पानसरे , संदेश आंभोरे , समीर खेंगले दशरथ पवार , नीरज मिश्रा उपस्थित होते. रूपेश घोजगे मित्र परिवाराचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

error: Content is protected !!