पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रक्षाबंधन भारतीय सैनिक बांधवांना राख्या बांधून साजरा केला जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांनी दिली.
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सन २०१९ पासुन संस्कार प्रतिष्ठान चे सभासद,महिला बचत गट,राज्यातील सभासद,आणि राज्याबाहेरील सभासद असे मिळुन भारत पाकिस्तानच्या आटारी सिमेवरील जवांना राख्या बांधुन रक्षाबंधन साजरी करत असतात.
यावर्षी बुधवार दि,३०/८/२०२३ रोजी रक्षाबंधन आहे त्यानिमित्ताने संस्कार प्रतिष्ठानचे ९८ महिला सभासद आणि परिवार शनिवार दि.२६/८/२०२३ रोजी रवाना होत आहेत.येथे जवांनाना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे.