गांजाचे सेवन केलेल्या ११ जणांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई
श्रावणी कामत:प्रतिनिधी
लोणावळा:
गांजाचे सेवन केलेल्या अकरा जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीसांनी कारवाई केली. संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत सत्यसाई कार्तिक सहाय्यक पोलीस अधीक्षक  उपविभागीय पोलीस अधिकारी संकल्पनेतून ही कारवाई करण्यात आली.

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजाचे सेवन करणा-या  लोकांवर कारवाई करिता  नेमलेल्या विशेष पथकाकडून कारवाई झाली. ११ गांजाचे सेवन करणा-या विरोधात  एन.डी.पी.एस. कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशाप्रकारच्या ४ केसेस करण्यात आल्या आहेत. गांजाची वाहतूक व विक्री बाबत धकड कारवाई करीत २० किलो गांजा व वाहतूक करणारी दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

यापुढेही गांजा वाहतूक व विक्री करण्याच्या तसेच गांजा सेवन करणारे लोकांची माहिती मिळवून अशाप्रकारे विशेष पथके नेमून कारवाई करणार असे पोलीस निरीक्षक  किशोर धामळ यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक डॉ. अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, सहा. पोलीस अधीक्षक  सत्यसाई कार्तीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  किशोर धुमाळ लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, सहाय्यक. पोलीस निरीक्षक  देविदास करंडे, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस निरीक्षक सागर अरगडे, सहा. पोलीस उपनिरीक्षक  युवराज बनसोडे, जय पवार, गणेश होळकर, केतन तळपे, राहुल खैरे, संजय पंडीत, सतीश कुदळे, अमोल गवारे पोलीस मित्र अमित भदोरीया यांनी कारवाई केली.

error: Content is protected !!