आढले खुर्द:
येथील सावित्रीच्या लेकीची पायपीट थांबणार आहे,येथून चांदखेडच्या माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थिनींना लायन्स क्लब ऑफ पुणे मेट्रोपॉलिस यांच्या वतीने सायकलींचे वाटप करण्यात आले. मागील आठवडय़ात ‘मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन’ने मुलींची पायपीट करणारी व्यथा लाईव्ह दाखवली होती.
याची दखल घेत लायन्स क्लब ऑफ मॅट्रोपाॅलीसचे अॅक्टिव्हटी पर्सन भरत इंगवले व उद्योजक शशिकांत पाटील यांच्या पुढाकारातून ही मदत करण्यात आल. सायकली वाटप हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे.आढले खुर्द गावातील मुलीं चांदखेड येथे न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पायी जात आहे.
या सायकली मुळे मुलींचा जाण्या येण्याचा वेळ वाचणार आहे. मिळालेला वेळ त्यांना अभ्यासात करण्यास मदत होणार आहे सावित्रीच्या लेकीची पायपिट थांबली . मावळ सत्य लाईव्ह बुलेटीनच्या बातमीची दखल घेऊन आठ दिवसांत आढले खुर्द मधील *सावित्रीचा लेकीची* *पायपिट आता थांबली असल्याचे संजय शेडगे म्हणाले.
अकरा सायकलीचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष शंकर गावडे, सचिव महेंद्र परमार, खजिनदार रामचंद्र माने
Activity Chairperson भरत इंगवले,सदस्य गुलशन पाल,पुंडलिक दरेकर, चंद्रकांत दरेकर,विनोद बोडके
राजेंद्र गराडे
व मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे युवक अध्यक्ष राजेश वाघोले उपस्थित होते.वाघोले यांनी शाळेला लॅपटॉप देण्याचे आश्वासन दिले. सरपंच नंदाताई भालेसैन, जेष्ठ नागरिक शिवाजी काटे, दतोबा चांदेकर ,हनुमंत घोटकुले बाळासाहेब येवले, विजय शेडगे, तुकाराम काकडे, सुभाष चांदेकर, पांडूरंग पशाले,संतोष येवले, बिभीषण चांदेकर , आढले खु ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, व उपसरपंच, पपु चांदेकर उपस्थितीत होते.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिडीया सेलचे अध्यक्ष संजय शेडगे, सदस्य हिरामण येवले यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.मुख्याध्यापिका पिसाळ यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच योगेश भोईर यांनी केले.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम