संस्कार प्रतिष्ठानची इरसाळवाडी दुर्घटनेतील बांधवांना अर्थिक मदत
पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने इरसाळवाडी दुर्घटनाग्रस्त ४२ कुटुंबांना प्रत्येकी १००० रु याप्रमाणे ४२००० रुपयांची मदत करण्यात आली.
त्यांच्या तात्पुरत्या निवासस्थानी जाऊन खोपोलीचे नगरसेवक किशोर पानसरे यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले.
संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला साथ देत नागरिकांनी प्रतिसाद दिला.इर्शाळवाडी येथे जमावबंदीचा आदेश असल्याने खालापुरचे तहसिलदार आयुब तांबोळी आणि तहसिलदार पुनम कदम यांनी कमीतकमी सभासदांमध्ये कार्यक्रम घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.त्यांच्या सहकार्यांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.
यावेळी सातारा मित्र मंडळ सांगवीचे अध्यक्ष शिवाजी माने ,संजय चव्हाण , संस्कार प्रतिष्ठानचे जेष्ठ सदस्य प्रभाकर मेरुकर, सामाजिक कार्यकर्ते कैलास मोरे,संतोष मेंगाळ उपस्थित होते.गावकामगार तलाठी रणजित कवडे यांनी मदत केली.या गरजु कुटुंबांना मदत करणा-या सर्वाचे प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले.