सामाजिक कार्यकर्ते मुकुंद काळभोर यांचे निधन
पिंपरी:
काळभोरनगर, चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच दिशा सोशल फाउंडेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद वसंत काळभोर (वय ५२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी सुरेखा काळभोर, मुलगी ॲड. शिवांजली काळभोर, चार चुलते दत्तात्रेय काळभोर (माजी प्रशासन अधिकारी, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका), अशोक काळभोर (संचालक, गजानन लोकसेवा सहकारी बँक), संभाजी काळभोर (राष्ट्रीय खेळाडू), तानाजी काळभोर (सामाजिक कार्यकर्ते), मेव्हणे भाऊसाहेब भोईर (माजी नगरसेवक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका) आणि राजाभाऊ गोलांडे (माजी नगरसेवक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका) असा परिवार आहे.

error: Content is protected !!