सामाजिक कार्यकर्ते किशोर थोरात यांना मातृशोक
पुणे:
आधार शैक्षणिक संस्था,पुणे चे सचिव आणि सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ(Human Rights) या संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर अण्णासाहेब थोरात यांना बुधवार दिनांक ९ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांच्या मातोश्री  भागीरथी आणासाहेब थोरात यांना देवाज्ञा झाल्याने मातूशोक झाला आहे.

भागीरथी आण्णासाहेब थोरात यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी उक्कलगाव ता.श्रीरामपूर जि. अहमदनगर येथे त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी प्रवरा नदीच्या तीरी उक्कलगाव येथे करण्यात आला.

किशोर थोरात हे त्यांचे दत्तक पुत्र आहेत तर त्यांच्या मागे पती आण्णासाहेब विश्वनाथ थोरात, सून सविता किशोर थोरात व दोन नाती असा परिवार आहे.

कै.भागिरथीबाई या उत्तम गृहिणी होत्या आणि स्वतः शाळेचे शिक्षण न घेतलेल्या पण त्यांच्या जीवनात त्यांनी २२ मुलांचे शिक्षण करून प्रत्येकाचे जीवन घडविण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव व इतरांसाठी मदत करन्याच्या स्वभावाने नातेवाईकांमध्ये शोकांतिका पसरली आहे.

त्यांच्या अशा जाण्याने श्रीरामपूर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.अध्यात्म गुरू आणि श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग,औरंगपूर चे प्रमुख संजय तळोले यांनी  किशोर थोरात यांच्या घरी सांत्वनपर भेट घेतली.

त्यांचा दशक्रिया विधी दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ठीक ८.० वा प्रवरातीरी, उक्कलगाव येथे विधिवत करण्यात येणार असल्याची माहिती किशोर थोरात यांनी दिली.

error: Content is protected !!