तळेगाव दाभाडे:
मावळ तालुक्यातील ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे यांना
भारतरत्न जे.आर. डी.टाटा उद्योग पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे,उद्योजक रामदास काकडे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. काकडे मावळ तालुक्यातील पहिले उद्योजक आहेत,ज्यांना हा मानाचा पुरस्कार मिळणार आहे.
उद्योग क्षेत्रातील यशस्वी उद्योजक अशी काकडे यांची ओळख सर्वश्रुत आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते बुधवार, दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ४:०० वाजता ऑटो क्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, जुना मुंबई – पुणे हमरस्ता, चिंचवड येथे पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ विभागाचे संचालक सचिन ईटकर सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. टाटा मोटर्स लिमिटेडचे निवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर मुख्य अतिथी आहेत. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहे.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन