कामशेत:
पावसाळ्याचे दिवस सुरू आहे,त्यामुळे सर्प निघणे ही नैसर्गिक बाब आहे,विशेषतः ग्रामीण भागात सापांचा वावर अधिक वाढला आहे. नागरिकांनी सर्प आढळून आल्यावर घाबरून न जाता तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधा असे आवाहन सर्प मित्रांनी केले आहे.

नेसावे गावात नाग एका गृहिणीच्या निदर्शनास आल्यावर तिने तातडीने सर्पमित्राला तातडीने पाचारण केले. सर्पमित्रांनी तत्परता दर्शवित नागाला पकडून जंगलात सोडून दिले. याबाबतीत झालेली घटना अशी,नेसावे तालुका मावळ येथे श नामदेव शंकर शिरसट यांच्या घराशेजारील मोकळ्या जागेमध्ये दि ०५/०७/२०२३ रोजी दुपारी ०२:३० च्या वेळी पिवळ्या रंगाचा ०६.०५ फुट लांबीचा फुल ग्रोन स्पेक्टॅकल कोब्रा आढळून आला.

घरामध्ये प्रवेश करताना घरातील महिलांचे लक्ष गेले असता त्यांनी नेसावे गावातील सर्पमिञ  वर्षा व त्यांचे पती प्रदीप जोशी यांना फोन करून ही माहिती दिली. ते लगेच घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी मोठ्या शितापिने नागाला पकडून सुखरूप जंगलात सोडून दिला. त्याच्या मदतीमुळे सापापासून होणारी हानी टाळल्यामुळे शिरसट कुटुंबाकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

नेसावे गावच्या पोलिस पाटिल रेश्मा अंकुश शिरसट यांनी त्याच्या सहकार्याबद्दल कौतुक केले. व यापुढीही गावात अशी काही अपत्ती आली तर तुम्ही मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.

error: Content is protected !!