बोरज मध्ये आढळला 15 फूट अजगर
बघ्यांची गर्दी झाल्याने अजगरास सोडले सुरक्षित जंगलात
टाकवे बुद्रुक : बोरज हद्दीतील वनक्षेत्रात सुमारे 15 फूट अजगर आढळल्याने मोठी खळबळ उडाली. पाण्याचा प्रवाहात मस्तपैकी आराम करत बसलेल्या ह्या अजगरला पाहायला अनेक तरुणांनी गर्दी केली. पण, अजगराच्या जिवास धोका पोहचू नये त्यासाठी त्याला पुन्हा त्याठिकाणाहून पकडून घनदाट जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे.
बोरज गावाशेजारील एका गोठ्यापासून काही अंतरावर असलेल्या भागात अजगर असल्याची माहिती रोहन तिकोणे ह्या तरुणाने शिवदुर्ग टीमला दिली. शिवदुर्ग व वन्यजीवरक्षक टीमचे अनिल आंद्रे, दक्ष काटकर, जिगर सोलंकी, मोरेश्वर मांडेकर, किरण तिकोणे, यश वाडेकर, तेजस केदारी, बबलू मुऱ्हे ह्यांनी जाऊन पाहणी केली असता, अजगर हा त्याच्याच अधिवासात एका पाण्याच्या प्रवाहात विश्रांती घेत होता.
काहीतरी खाल्ल्याने त्याला हालचालही करता येत नव्हती. पण त्याठिकाणी बघ्यांची मोठया प्रमाणात गर्दी झाल्याने अजगर त्याठिकाणी असणे हे असुरक्षित वाटू लागल्याने त्याबद्दल वनविभागास माहिती देऊन त्यास पकडून मिळालेल्या ठिकाणाहून दूर घनदाट जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले आहे. यासाठी वन्यजीवरक्षक टीमचे अनिल आंद्रे, दक्ष काटकर, जिगर सोलंकी, मोरेश्वर मांडेकर, किरण तिकोणे, यश वाडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस