लोणावळा:
औंढालीत आढळून आले अजगर जातीचे पिल्लू,नागरिकांनी सतर्क राहून गरज पडल्यास सर्पमित्रांशी संपर्क साधावा असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.

मोरेश्वर मांडेकर यांना औंढोली गावातील एका घोड्याच्या फार्म हाऊस मधुन फोन आला की,” घोड्यांच्या चारा असलेल्या रूम मध्ये अजगर जातीचे  पिल्लु आहे. त्यांनी लगेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे व संस्थेचे  अध्यक्ष अनिल आंद्रे यांना माहीती दिली.

मोरेश्वर मांडेकर, बंधु निलेश मांडेकर यांना घेऊन गेले. साधारण ३फुटाचे अजगर जातीचे पिलू दिसून आले. तेथील फोन करणारे मंगेश तायडे यांनी यापूर्वी दहा ते बारा दिवसांपूर्वीच असेच एक अजगराचे पिल्लू  त्यांच्या दुसऱ्या बंगल्याच्या बाथरूम मध्ये आहे कळवले होते,त्या पिल्लाला रेस्क्यू करून सोडून देण्यात आले होते.

त्यांच्या सोबतचे हे छोट पिल्लु रेस्क्यू करून त्याला सोडून दिले.सर्पमित्रांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!