एका क्षणात होत्याच नव्हतं..माळीण-तळीयेची पुनरावृत्ती..इर्शाळवाडी वर दरड.. म ३० ते ३५ घरे मलब्याखाली… नागरिकांचा हबरडा.. मावळ कर धावले मदतीला..
पवनानगर:
मुंबईसह राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. बुधवारी रात्री खालापूरजवळील इरसालगड (इरसाल  वाडी) येथे दरड कोसळून अनेक कुटुंब मलब्याखाली अडकून मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या गावात ५५ ते ६५ घरांची वस्ती असून जवळपास २०० ते २५० लोक असल्याचे समोर आलेय.

प्राथमिक माहितीनुसार मलब्याखाली अंदाजे ३५ ते ४० घरातील लोक अडकले आहेत. अनेकजणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अनेकांना वाचवण्यात यश आलेय. तर घटनेच्या तिसऱ्या दिवसा पर्यंत बचावकार्य सुरु आहे.  नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाजवळ ही घटना घडली.

इर्शाळवाडी तील बचावलेले नागरिकांना खालापुर इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगड जिल्हा परिषद नानिवली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ७० ते ७५ नागरिकांना सुखरूपपणे ठेवण्यात आले होते त्यांना जवळच असलेल्या गडळचे मंदिरामध्ये काही दिवसासाठी स्थलांतरित केले असून त्याठिकाणी सर्व राहण्याची व जेवणाची सोय केली आहे. त्यानंतर त्यांना नवीन तात्पुरत्या स्वरुपाच्या घराची सुविधा करणार आहोत.बचावकार्य युध्द पातळीवर चालु आहे.

इर्शालवाडीमध्ये माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. रायगडमधील तळीये आणि माळीण गावावर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाले होता. तळीये गावातील ३५ घरांवर दरड कोसळली होती, यामध्ये ४४ जणांचा मृत्यू झाला होता. तर माळीणमध्ये १५१ जणांनी आपले प्राण गमावले होते. सकाळी माळीण गावावर डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ माळीण गावातील ७४ पैकी ४४ घरे दबली गेली.

जवळजवळ संपूर्ण गाव क्षणार्धात गायब! यामध्ये १५१ जणांचा प्राण गेला होता. याच दुर्घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली आहे. इरशाळगडमधील ३० पेक्षा जास्त घरावर दरड कोसळली आहे.  मलब्याखाली आणखी  ५० ते ६० मृतदेह अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ,विविध दुर्ग प्रमी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे.

इरशाळगड गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तात्काळ इरशाळगड  येथील दुर्देवी घटनेचा आढावा घेतला. त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिवसभर घटनास्थळावर दिवसभर मदत कार्य केले आहे.तसेच यावेळी मावळ मधून मदतीसाठी अमित ठाकर,सचिन ठाकर,विक्रम ठाकर,निलेश ठाकर,प्रजेश साबळे यांच्या सह अनेक तरुण मदतीसाठी धाऊन गेले होते.

पावसामुळे अजूनही डोंगरावरची माती घसरतेय.गावापर्यंत पोहोचण्यासाठी  रस्ता नसल्याने वाहने जात नाहीत.एक ते दिड तास चालत जावं लागत आहे.

रितु ठोंबरे सरपंच चौक ग्रुप ग्रामपंचायत म्हणाले,”  इर्शाळवाडी दुर्घटनेतील ७० ते ७५ नागरिकांचे स्थलांतर गडळचे मंदिरामध्ये काही दिवसासाठी स्थलांतरित केले असून त्याठिकाणी सर्व राहण्याची व जेवणाची सोय केली आहे. त्यानंतर त्यांना नवीन तात्पुरत्या स्वरुपाच्या घराची सुविधा करणार आहोत.बचावकार्य युध्द पातळीवर चालु असुन ज्या पुणे,रायगड, मावळ,अशा विविध जिल्हा व तालुक्यातील संस्थानी तसेच प्रशासनाकडून जी मदत केली त्या सर्वाचे आभार मानते.

error: Content is protected !!