वडगाव मावळ:
  वाढदिवसाच्या अनाठायी खर्चाला बगल देत सामाजिक दायित्व जपण्याचा प्रयत्न वडगांव शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अनंता कुडे यांनी केला आहे. कुडे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ येथील प्रभाग क्रमांक १५ मधील ठाकरवस्ती भागातील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच चिमुकल्यांना खाऊ देण्यात आला.
माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर , ज्येष्ठ नेते सोमनाथ काळे, नगरसेवक प्रवीण चव्हाण, नगरसेवक ॲड.विजयराव जाधव यांनी शुभेच्छा व्यक्त करीत अध्यक्ष अनंता कुडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

नगरसेवक रविंद्र म्हाळसकर , वडगांव शहर भाजपा कार्याध्यक्ष नगरसेवक प्रसाद पिंगळे , संघटन मंत्री किरण भिलारे,  माजी सरपंच नितीन कुडे , माजी उपसरपंच संभाजी म्हाळसकर , सरचिटणीस कल्पेश भोंडवे , सुनिल कुडे,सागर मराठे ,प्रमोद नवघणे,मावळ फेस्टीवल चे संचालक महेंद्र म्हाळसकर ,
वडगांव शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे,उपाध्यक्ष कुलदीप ढोरे , प्रमोद नवघणे, सोमनाथ पवार,शिक्षक वृंद चेतना ढोरे , पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला मिळालेल्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांनीही जल्लोष करीत आनंद व्यक्त केला.

error: Content is protected !!