वडगाव मावळ: मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरात वृक्षसंवर्धन वाढीसाठी नागरिकांना ५००० झाडांचे वाटप करण्यात आले.

मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या स्वखर्चाने वडगाव कातवीतील रहिवाशांसाठी “मागेल त्याला मोफत झाड” या उपक्रमांतर्गत सुमारे पाच हजार फळ, फुल व सावली देणा-या झाडांचे वाटप मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
वडगाव नगरपंचायत गेली तीन वर्षांपासून माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण या अभियानात सक्रीय सहभाग घेत असून संपूर्ण वडगाव शहरांमध्ये वृक्षारोपण तसेच स्वच्छतेसाठी विविध उपक्रम व उपाययोजना राबविण्यात येत असतात.

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम, उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, नगरसेविका पूनम जाधव, पूजा वहिले, अतुल वायकर, सिद्धेश ढोरे, गणेश जाधव, मोरया प्रतिष्ठान व मोरया ढोल पथकाचे सदस्य, वडगाव नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि वडगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील नागरिकांनी आपापल्या परिसरात वृक्षसंवर्धन वाढीसाठी झाडे लावणे काळाची गरज असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मोरया प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील नागरिकांना आंबा, नारळ, फणस, चिकू, जांब, पेरू, बदाम, जांभूळ, बकुळ, ताम्हण, सोनचाफा, बेल, कदंब, कडुनिंब, आवळा इत्यादी पाच ते सहा फूट उंचीची झाडे विनामूल्य वाटप केली.

error: Content is protected !!