सोमाटणे:
आढे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील श्रावण ज्ञानेश्वर तिडके विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. आढे शाळेतील इयत्ता पाचवीतील एकूण १९  विद्यार्थ्यांपैकी बारा विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून नवोदय विद्यालयासाठी श्रावण ज्ञानेश्वर तिडके याची निवड झाली.

पाचवीतील विद्यार्थ्यांनी गैरहजर न राहता उत्तम प्रकारे अभ्यास केला .ज्यादा तास घेऊन अभ्यास केला .शिक्षकांनी जादा तासाचे उत्कृष्ट नियोजन करून विद्यार्थ्यांना यश प्राप्त करून दिले .या यशात सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे .वर्गशिक्षिका वैशाली जुन्नरकर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापिका आरती मेस्त्री, भागीत सर ,शिंदे सर ,सारडा सर स्कॉलरशिप तज्ञ श्रीकांत दळवी सर यांनी यासाठी परिश्रम घेतले. आढेचे शैक्षणिक वातावरण निश्चितच कौतुकास्पद आहे. या शैक्षणिक वातावरणाचा देखील या गुणवत्तापूर्ण निकालावर परिणाम झाला म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

बौर केंद्राचे केंद्रप्रमुख  ताते सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.गटशिक्षण अधिकारी  सुदाम वाळुंज,  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर सुतार , उपाध्यक्ष शंकर सुतार सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य त्याचबरोबर आढे ग्रामपंचायत सरपंच सुनीता सुतार व सर्व ग्रामपंचायत समिति सदस्य आढे ग्रामस्थ यांनी सर्व विद्यार्थ्याचे कौतुक केले.

शाळा समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सुतार म्हणाले,”खरोखर आमच्या आढे गावासाठी श्रावण ज्ञानेश्वर तिडके याची नवोदय विद्यालयासाठी निवड होणे ही आम्हा गावासाठी खूप खूप अभिमानाची बाब आहे.

error: Content is protected !!