सोमाटणे:
दिवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालखी सोहळा रंगला.वृक्षदिंडी,ग्रंथदिंडी,विज्ञान दिंडी व आरोग्यदिंडी तून विद्यार्थ्यानी सामाजिक संदेश दिला.सामाजिक संदेश देत ही दिंडी संपूर्ण गावातून पायी निघाली.

या दिंडी सोहळ्यात विद्यार्थी, शिक्षक,पालक आणि  ग्रामस्थांनीही सहभाग घेतला.पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी विठ्ठल, रुख्मिणी, संत व वारकरी वेशभूषा करुन पालखी सोहळ्यात सहभागी झाले.

या दिंडी सोहळ्यात वृक्षदिंडीच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे  ,आरोग्यदिंडीतून सुदृढ निरामय आरोग्याचे,विज्ञानदिंडीतून विज्ञानाचा तंत्रज्ञानाचा  सकारात्मक वापर,ग्रंथदिंडीतून वाचन चळवळ या बाबींचे महत्व  पटवून देण्यात आले.

विद्यार्थी हा सामाजिक संदेश देत असतानाच पालकांनी भजन ,अभंग गायन केले.सारे गाव भक्तीरसात न्हाऊन निघाले होते. गावातील हनुमान मंदिरात पालखी सोहळ्याची सांगता केली. अध्यात्म ते विज्ञान या विषयावर शाळेच्या शिक्षिकासोनाली नलावडे यांनी मार्गदर्शन केले.
मातापालक संघाकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.
कार्यक्रमाचे नियोजन जि.प.शाळा दिवड व अंगणवाडी केंद्र दिवड यांनी केले.

error: Content is protected !!