वडगाव मावळ:
येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या चिमाजी देशपांडे यांच्या समाधीची दुरावस्था झाली ,असून दगडांची पडझड सुरू झाली आहे.अतिक्रमणामुळे रस्ता देखील बंद झाला आहे.  या समाधीची   दुरूस्ती करावी अशी मागणी शिववंदन ग्रुपच्या सभासदांनी केली. 

मोगलांविरोधातील लढाईत वीरगती प्राप्त झालेल्या पुण्यातील चिमणाजी बाळाजी देशपांडे ( नरेकर) यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी वडगाव येथे बांधलेली समाधी आहे. सुरत वरून परतत असताना मोगलांनी त्यांना गाठून मारण्याचा प्रयत्न केला.महाराजांसोबत सैन्य घोडे होते.पण लुटीची संपत्ती घोड्यांवर लादली असल्याने युध्द करणे शक्य नव्हते.

त्यामुळे महाराजांनी चिमणाजी देशपांडे यांना पुण्यातून दोन हजार सैन्य घेऊन मोगलांना रोखण्यास सांगितले. त्यावेळी तळेगाव, वडगाव  या भागात तीन दिवस तुंबळ लढाई झाली.त्यात चिमणाजींना वीरमरण आले.राजगडावर पोहच्यानंतर महाराजांना हे वृत्त समजल्यानंतर त्यांनी ४ फेब्रुवारी १६६४ रोजी त्यांनी वडगाव मावळ येथे येऊन चिमणाजींची समाधी बांधली .

या समाधी स्थळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेसह अनेकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. पुण्यातील चिमणाजींचे वंशज देशपांडे कुटूंबीयांनी देखील सात ते आठ वर्षांपूर्वी या समाधिला भेट दिली होती .जिल्हातून अनेकजन या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात 

या रस्ता पूर्वी पासून होता.परंतू एका खाजगी मालकाने कंपाऊट केल्याने तो फक्त तीन फुटाच्या राहिला आहे. त्यामुळे या समाधीची पुजा अर्चा, अभिषेक करण्यासाठी देखील मोठी कसरत होत आहे. सदरचा रस्ता खुला करून या समाधीची दुरूस्ती करावी अशी मागणी शिववंदन ग्रुपचे तुषार वहिले  दिनेश ठोंबरे, मंगेश वाघमारे, संतोष देशमुख यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी व पुरातत्व विभागाकडे केली आहे.

error: Content is protected !!