नेतृत्व – एक कर्तृत्वाची परिणिती
नेतृत्व-मुळातच आपल्यात दातृत्व असलं की आपल्या हातून कर्तृत्व आपोआप होत आणि एकदा का आपलं कर्तृत्व समाजापुढे सिध्द झालं तर आपोआपच आपल्याला नेतृत्व मिळत.
नेता म्हणजे नेणारा, मार्ग दर्शन करणारा, एका समूहाला वाटचाल करण्यासाठी दिशा दाखवणारा असा अर्थ अभिप्रेत आहे. काही वेळा कतृत्वाने नेत़ृत्व तुमच्यावर लादलं जात.
लादल गेलेलं नेतृत्व आणि चालत आलेल नेतृत्व हे दोघांच्या नेतृत्वाकडे बघण्याचा दृष्टीकोनात फरक आहे, त्याची फलश्रुती, त्याचा होणारा परिणाम नेहमी सकसं निरंतर आणि चांगलाच होणार आहे.
पण ज्याच्यावर लादलं गेलं आहे त्या नेतृत्वामुळे नेतृत्वामुळे त्याच्या हातून कार्य घडलेच असं सांगता येणार नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील नेतृत्व ज्या ज्या व्यक्तींकडे गेल त्या त्या व्यक्ती अत्यंत कर्तृत्व संपन्न देशप्रेमाने झपाटलेल्या व ज्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभाई पटेल, अशी कितीतरी व्यक्तीमत्व आपण बघतो ही त्यांच्या कार्यप्रणालीतूनच तयार होतात.
एखाद्या गल्लीतील गणेश मंडळातील कार्य करणारा कार्यकर्ता तो गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचं नेतृत्व आपल्या नेतृत्व कौशल्याने मिळवू शकतो.
उदाहरणार्थ आपण डॉक्टर दत्ता सामंत यांचे नाव घेऊ. डॉक्टर सामंत एक एमबीबीएस एका फॅक्टरीच्या जवळ त्यांचा दवाखाना होता फॅक्टरीच्या कामगाराचे अनेक प्रश्न होते.
वैद्यकीय सेवा करत असताना काही कामगारांचे प्रश्न त्यांच्यासमोर प्रश्न त्यांच्या समोर येत.
हे प्रश्ण सामंजस्याने सोडवण्यासाठी त्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापकांशी संवाद करण्याचा प्रयत्न केला पण ते त्यात अयशस्वी झाले.
कामगारांवर होणारा अन्याय, अत्याचार त्यांच्या डोळ्यासमोर होता, तो थांबवावा म्हणून त्यांनी कामगारांची संघटना उभी केली आणि त्यांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी झाले.
त्यामुळे आपोआप कामगार युनियनचे ते नेते बनले त्यांच नेतृत्व त्यांना मिळालं पण….
पुढे पुढे त्यांचं कामगारांचे नेतृत्व भरकटत गेले.
त्यांनी मुंबईच्या चालू असलेल्या सूत गिरण्या बंद पाडल्या, कामगार देशोधडीला लागले, रस्त्यावर आले आणि संपूर्ण मुंबईची पिढी बरबाद झाली.
हा इतिहास आपल्यासमोर अजूनही आहे.
म्हणून उत्तम नेतृत्व निरोगी समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे.
बहुजन समाज हा मेंढरासारखा असतो मेंढपाळ त्या मेंढराना जस वळण देईल तसतसं तो मेंढ्यांचा कळप चालत असतो.
म्हणून हा नेता निस्वार्थी, जनहित सांभाळणारा, सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवणारा आणि चारित्र्यसंपन्न असा असला पाहिजे.
तरच त्याच्या हातून निकोप अशी कृती घडु शकेल.
साधारणपणे लीडरशिप किंवा नेतृत्व हे दोन प्रकारचे असतात आणि खरोखरच एक लीडर असतात तर दुसरे फॉलोअर्स असतात.
वरील शब्दांचे स्पष्टीकरण करायचे म्हणजे एखाद्या गृहिणीकडे माहेरची माणसे येणार आहे, म्हटलं तर ती मन लावून, जीव ओतून उत्तम स्वयंपाक करेल यात शंका नाही, पण त्याच वेळी तिच्याकडे तिच्या सासरची माणस येणार असतील तर ती तोच स्वयंपाक करेल पण त्यात तिने जीव ओतलाच असेल असे सांगता येणार नाही.
तिची पहिली कृती लीडर सारखी आहे, दुसरी फॉलोअर सारखी आहे.
हा गुणधर्म प्रत्येकाला आपल्या व्यावसायिक, कौटुंबिक, -सामाजिक, व्यक्तींमध्ये दिसून येतो.
उदाहरणात एक डॉक्टर त्याने डाॅक्टरकी पेशा पत्करला आहे कारण त्याला दुसर्यांची सेवा मनापासून करायची आहे पण तोच दुसरा डॉक्टर त्याची इच्छा नाहीये पण त्याच्या आई-वडिलांची इच्छा आहे तो डॉक्टर व्हावं तेव्हा प्रयत्नांची पराकाष्टा करून डॉक्टर होईल पण त्याची लीडरशिप असेलच असे सांगता येणार नाही.
म्हणून नेतृत्वासाठी अत्यंत महत्वाचा असा गुण आवश्यक आहे तो म्हणजे तुम्हाला त्याची मनापासून आवड असली पाहिजे.
तरच त्यात जीव ओतून पूर्ण ताकदीनिशी आपले सर्वस्व पणाला लावू शकतो, झोकून देऊ शकतो.
त्यामुळे एक मात्र निश्चित होते की तुम्हाला यश मिळो न मिळो पण नेतृत्व केल्याचे समाधान निश्चित प्राप्त होते.
एका कुटुंबाचे नेतृत्व,एका जातीचं नेतृत्व, एका धर्माचे नेतृत्व, एका राष्ट्राचे नेतृत्व ज्यावेळी तुमच्याकडे दिलं जातं त्यावेळी त्यांच्या परिणामांचे भान त्या नेतृत्वाचं भान आपल्याला असलं पाहिजे.
आपल्या चुकीच्या नेतृत्वा मुळे होणारे चांगले वाईट परिणाम त्याची पूर्ण कल्पना आपल्याला असली पाहिजे.
त्यासाठी खालील गुण आवश्यक आहेत.
“कष्टाच्या जंगलात बिनधास्त घुसणे, उपक्रमांचा गालिचा सततच विणत राहणे, सर्वांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक भूमिका बजावणे,
सर्व गुणांच्या राजा नम्रता, याचं काटेकोरपणे पालन करणे, जेणेकरून आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून मिळणाऱ्या फळाचे श्रेय समूहाकडे जाईल आणि आपण अलिप्त राहू.
अशी भूमिका घेतली तर खऱ्या अर्थाने आपण आदर्श नेतृत्व देणारी व्यक्ती ठरू शकतो यात मुळीच शंका नाही.
आजचा विषय आपल्या सर्वां पर्यंत पोहोचला असेलच म्हणून इथेच थांबतो.
( शब्दांकन- ला.डाॅ.शाळिग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस