जीवन यांना कळले हो!
होय मित्रांनो,
जन्माला आल्याचे सार्थक कसे होणार? या प्रश्नाचा आपण प्रथम विचार करणार आहोत! ज्या अर्थी आपण जन्माला आलेलो आहोत त्याअर्थी आपला मृत्यू सुद्धा अटळ आहे! हे सत्य आपल्याला स्वीकारलंच पाहिजे.
पण तो येण्यापूर्वी आपण आपल्या जीवनाचं काहीतरी ध्येय हे निश्चित केलंच पाहिजे की- जेणेकरून मृत्यूनंतरही लोक आपली आठवण करतील एवढेच नव्हे तर लोकांना त्यापासून काहीतरी प्रेरणा प्राप्त होईल! म्हणूनच मित्रांनो- आपल्या जगण्याचा उद्देश सर्वप्रथम आपल्याला कळलाच पाहिजे.
जो आपल्या कुटुंबासाठी– समाजासाठी आणि पर्यायाने देशासाठी उपयुक्त ठरेल! त्याप्रमाणे आपणच स्वतः विचारपूर्वक जीवनाचा प्रवास आणि त्याचा आराखडा आखलाच् पाहिजे! त्यासाठी आपल्या क्षमतेप्रमाणे कौशल्य प्राप्त करून त्या त्या क्षेत्रात ठसा उमटेल असेच कार्य आपल्या हातून घडलं तरच आपण आपलं उद्दिष्ट पूर्ण करू शकतो.
त्यासाठी आत्मपरीक्षण- योग्य मार्गदर्शन आणि त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच परिपूर्ण सहकार्य जर आपल्याला मिळत गेलं तर आपण यशस्वी होणारच! त्यामुळेच आपण जन्माला आल्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही!
(शब्दांकन-ला.डॉ. शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे)