निराधार आजी-आजोबांसोबत शालेय विद्यार्थ्यांनी वृध्दाश्रमात साजरा केला योग दिन
टाकवे बुद्रुक:
आदिवासी गावातील शालेय विद्यार्थ्यांनी येथील सहारा वृध्दाश्रमात निराधार आजी-आजोबांसमवेत आज योग दिन साजरा केला.
आंदर मावळातील कुसवली या आदिवासी गावात पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक गोकूळ लोंढे,शिक्षिका संगीता ससाणे, केंद्र प्रमुख रघुनाथ मोरमारे यांनी योग दिन निराधार आजी-आजोबांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार येथील सहारा वृध्दाश्रमातील निराधार आजी आजोबांसोबत सर्वांनी हा जागतिक दिन साजरा केला.
या प्रसंगी योगाचे महत्त्व, आरोग्य साधना व भारताची प्राचीन संस्कृती याविषयी शिक्षकांनी सर्वांना मार्गदर्शन केले. वृध्दाश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी आभार मानले.
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!
- समर्थ विद्यालयात तब्बल ४२ वर्षांनी भरला इ.१०वीचा वर्ग देश विदेशातून विद्यार्थ्यांची हजेरी
- औद्योगिक नगरीत मतदार जनजागृती अभियान