कामशेत येथील शाळांत विविध उपक्रमांचे आयोजन
शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना खाऊ वाटप व शालेय साहित्य वाटप
कामशेत :- येथील जिल्हा परिषद पाथमिक शाळा येते नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्याचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तक दिन साजरा करत पाचवी ते आठवीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शासनामार्फत प्राप्त मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
या वेळी सह्यादी विद्यार्थी अकादमी चे अश्विन दाभाडे, केदार डाखवे,सुनील वाघमारे, चेतन वाघमारे, रमेश जगनाडे ,निखिलेश दोंडे, विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.