तळेगाव स्टेशन:
माजी विद्यार्थ्यांकडून नवीन समर्थ विद्यालयास दोन              ई लर्निंग प्रोजेक्टर सेट भेट देण्यात आले. नवीन समर्थ विद्यालयातील शैक्षणिक वर्ष सन १९८४-८५ मधील विद्यार्थ्यांनी  विद्यालयास सदिच्छा भेट देऊन विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दोन ई लर्निंग प्रोजेक्टर्स भेट दिले.
आहेत

नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या शालेय समितीचे अध्यक्ष महेश शहा, प्राचार्य संजय वंजारे पर्यवेक्षक  रेवप्पा शितोळे उपस्थित होते. ई-लर्निंग प्रोजेक्टर चे उद्घाटन करण्यात आले. ४०  वर्षांनंतर  राजू दाभाडे , उमेश महाजन,  बाळासाहेब दळवी,  गजानन भोईरकर , मदन आडिवळे, दिगंबर राक्षे, डॉ. वंदना पिंगळे यांनी विद्यालयास भेट देऊन माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.

आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग प्रोजेक्टर भेट देण्यात आले .यावेळी या विद्यार्थ्यांना शिकविणारे अध्यापक  इरावती केतकर, शंकर नारखेडे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

नवीन समर्थ विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय वंजारे पर्यवेक्षक  रेवप्पा शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा काळे यांनी केले.

error: Content is protected !!