पालखी मार्गावर स्वच्छता अभियान
पिंपरी:
पिंपरी चिंचवड मनपा फ प्रभाग सहाय्यक आयुक्त  सिताराम बहुरे  आणि संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर भक्ती शक्ती ते निगडी या परिसरातुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

पालखी मार्गावर पडलेले प्लॕस्टीकचे ग्लास,पाण्याच्या बाटल्या,केळीची साल,भिस्किट पुड्यांचे रँपर,प्लॕस्टीक झाडून घेऊन साफसफाई करण्यात आले.जवळजवळ ५०० कि प्लॕस्टीक कचरा जमा करण्यात आला.

यासाठी फ प्रभागाचे आरोग्य अधिकारी शांताराम माने साहेब यांनी सहकार्य केले.
अभिनेत्री रुपाली पाथरे,आनंद पाथरे,शब्बीर मुजावर,मनोहर कड,नम्रता बांदल,रंजना गोराणे,पल्लवी नायक,महेंद्र जगताप,भानुप्रिया पाटील,,मिनाक्षी मेरुकर,विद्या भागवत,भरत शिंदे,सुनंदा निक्रड,नसिम शेख,अर्पिता आजगावकर,अलका कुसळ,प्रमाकर मेरुकर  यांनी सहभाग घेतला होता.

error: Content is protected !!