टाकवे बुद्रुक: येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या
बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा इयत्ता दहावीचा सन २०२२ – २३ या शैक्षणिक  वर्षाचा निकाल यंदाही १००  % निकाल लागला.
प्रथम क्रमांक ओम उत्तम चोरघे याने मिळवला.त्याला ७८ टक्के गुण मिळाले. व्दितीय क्रमांक अनुभव अनिल असवले याने ७३.४० टक्के मिळवून पटकाविला. तृतीय क्रमांकसाक्षी प्रवीण असवले हिला मिळाला. तिला ७३.२० टक्के गुण आहेत.

शाळेची इयत्ता 10 वी ची ही पाचवी बॅच आहे, आणि सलग पाच वेळा १००  % निकाल* लागलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी असवले, राजमाता  जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक  सचिव .रामदास वाडेकर, उपाध्यक्ष मनोज जैन, खजिनदार तानाजी आसवले,संचालक राज खांडभोर, संचालक आतिश परदेशी, स्वामी जगताप, भूषण असवले, पांडुरंग मोढवे, सोमनाथ आसवले, दत्ता गायकवाड  रामदास कोदरे  यांनी  विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

शाळेचे शिक्षक राज सर, पूजा टिचर, नेहा टिचर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवत्तापूर्ण अभ्यासाला कुठेही मागे नाही हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले.

error: Content is protected !!