इंदोरी:
इंदोरी च्या प्रगती विद्या मंदिर शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या विद्यालयातील आंटद  गायत्री श्रीशैल  हिने 95.20%* गुण मिळवून मावळ तालुक्यात मराठी माध्यमात  द्वितीय क्रमांक तसेच  तळेगाव केंद्रांत मराठी माध्यमाच्या शाळेत  प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

त्याबद्दल गायत्री तिचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे.प्रशालेचे एकूण 113 पैकी 111 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन  विद्यालयाचा निकाल 98.23% एवढा लागला आहे. Distinction मध्ये 23 व प्रथम श्रेणीत 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.  उत्तम यशाची परंपरा अखंडपणे चालू राहिलेली आहे.

विद्यालयात  प्रथम  क्रमांक 1) कु.गायत्री श्रीशैल आंटद 95.20%
द्वितीय क्रमांक २) कु. रोशनी भरत नेमाने – 94.00%
.तृतीय क्रमांक ३)ओंकार प्रभू पवार 93.00%
चतुर्थ क्रमांक ४)कु.तनुजा दत्तात्रय खुस्पे 91.40%
पंचम क्रमांक५)कु.अक्षता भागवत साबळे 87.80 %

    या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्राचार्य सुदाम वाळुंज, पर्यवेक्षक राजेंद्र वाजे, वर्गशिक्षिक ज्योती पिंजण, लक्ष्मण मखर,मच्छिंद्र बारवकर तसेच विषय शिक्षक रेखा भेगडे, संजय खराडे, श्रध्दा मोहळ,अलका आडकर, अश्विनी शेलार,दिलीप पोटे, अनिता आगळमे, स्वाती गाडे, संतोष कदम,आदिती कडवईकर, अश्विनी कुलकर्णी यांनी केले.
   
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक तसेच आठवी पर्यंत पाया भक्कम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन व कौतुक नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री  संजय तथा बाळा भेगडे,  उपाध्यक्ष  गणेश खांडगे , सचिव  संतोष खांडगे, सहसचिव  नंदकुमार शेलार, खजिनदार  राजेश म्हस्के, शालेय समिती अध्यक्ष  दामोदर शिंदे , मावळचे पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, मा.जि.प.सदस्य प्रशांतशेठ ढोरे इंदोरी गावचे सरपंच शशिकांत शिंदे व ग्रामपंचायत इंदोरीचे आजी माजी सरपंच उपसरपंच व सदस्य, इंदोरी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केले.

error: Content is protected !!