तळेगाव स्टेशन:
येथील भाऊसाहेब सरदेसाई नर्सिग स्कूल येथे जागतिक पारिचारिका दिन साजरा करण्यात आला.आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन जगभर साजरा साजरा करण्यात येतो.

लेडी विथ दि लॅम्प — म्हणून संपूर्ण जगभर प्रसिद्ध असलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा 12 मे हा त्यांचा जन्मदिवस! त्यांचा जन्म 12 मे सन अठराशे 20 ला इंग्लंड मध्ये झाला! त्यांच महानिर्वाण 13 ऑगस्ट एकोणीसशे दहाला झाले.

त्यांनी अठराशे 56 पर्यंत लढाईत जखमी झालेल्या सैनिकांची सेवा केल्यानंतर संपूर्ण आयुष्य रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या समर्पित भावनेने त्या कार्यरत राहिल्यात! परिचारिकावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देऊन त्यांनी त्यांना आत्मसन्मान मिळवून दिला.

या सर्वांच औचित्य साधून तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित नर्सिंग स्कूलच्या कार्यक्षम प्राचार्या मोनालीसा मॅडम -त्यांचा सर्व अध्यापक वर्ग आणि विद्यार्थी या सर्वांनी मिळून हा जागतिक परिचारिका दिन अत्यंत प्रसन्न पवित्र आणि देखण्या स्वरूपात साजरा केला.

प्रमुख अतिथी- संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री गणेशजी खांडगे विशेष अतिथी डॉक्टर दीपक भाई शहा उपाध्यक्ष श्री चंद्रभानजी खळदे आणि पालकमंत्री ज्येष्ठ डॉक्टर शाळीग्राम भंडारी आणि मावळसत्य या वृत्तपत्राचे संपादक रामदास वाडेकर या सर्व अतिथींचं प्राचार्य सौ मोनालिसा मॅडम व त्यांच्या स्टाफने यथोचित स्वागत केल्यानंतर या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने या प्रसन्न- पवित्र समारंभाच  उद्घघाटन करण्यात आले.

” आवर- नर्सेस- आवर फ्युचर”- या थीम विषयी- विशेष माहिती मिस क्रिस्टना रणभिसे मॅडम यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली! मिस दिव्या केदारी या विद्यार्थिनीने अत्यंत अभ्यासपूर्ण अशी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या विषयी माहिती उपस्थितांना कथन केली! त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाततून नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनीनी आपली विविध नृत्य कला सादर करून पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले.

साहित्य कला क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांच विविध बक्षीसाद्वारे  पाहुण्यांच्या हस्ते  कौतुक करण्यात आलं! कारण शाबासकीची थाप- कौतुकाचे शब्द आणि मायेचा स्पर्श कलाकाराला खूप काही सांगून जातो आणि हे सर्व पारितोषिक स्वीकारणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रत्यक्ष आम्हाला पहायला मिळाल.

अध्यक्ष श्री गणेश खांडगे सरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच भरभरून कौतुक केलं आणि त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा प्रदान केल्या! संस्थेचे उपाध्यक्ष श्री चंद्रभानजी खळदे यांनी नर्सिंग व्यवसायातील कर्तव्य आणि अधिकार याची जाणीव आपल्या अनेक उदाहरणातून विद्यार्थ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवली.

विशेष अतिथी डॉक्टर दीपकभाई शहा यांनी आपल्या मनोगतात- आपण स्वतःला कधीच कमी लेखू नका! उलट जीवनात उच्च ध्येयाने प्रेरित होऊन अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील रहा असा सकारात्मक विचार मांडला! पालकमंत्री डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी शेरोशायरी आणि विविध काव्यरचनेतून आपल्या ओघवत्या  भाषणात- नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांना-” खालील सेवन डी म्हणजेच – ड्रीम- डिझायर- डिटरमिनेशन- डीवोशन  डिरेक्शन- डिसिप्लिन डेडलाईन -च्या माध्यमातून यशस्वी जीवनाची गुरुकिल्लीच सादर केली.

आपल्या चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ वैद्यकीय सेवेतील जीवघेण्या विविध घटना आणि अनुभव सांगत असताना नर्सिंगस्कूलच्या प्रत्येक विद्यार्थ्यांची भूमिका डॉक्टरांन इतकीच   महत्त्वाचीआहे हे ही त्यांनी विविध उदाहरणाद्वारे उपस्थितांना पटवून दिले! मिस श्रद्धा  जेटीथोर आणि मिस सोनाली पवार या दोघांनी उत्तम सूत्रसंचालन केल्याने कार्यक्रमाची उंची वाढली!

हा समारंभ पूर्णतः यशस्वी होण्यासाठी {जी एन एम}थर्ड इयर च्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य मोनालिसा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष परिश्रम घेतलेत! मीस  स्मिता कदम मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!