कोईभी लक्ष मनुष्य के साहससे बडा नही! हारा वही- जो मुसीबतोके सामने खडा नही!
होय मित्रांनो,
एखाद्या व्यक्तीकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो म्हणजे नेमकं काय असतं?-तर त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत बरेचदा नकारात्मक असू शकते किंवा चुकीचीही असू शकते.
कारण अंतर्मनाच्या भीतीचा परिणाम हा निश्चितच आपल्या विचारांवर होत असतो! त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे उपजतच असलेली बुद्धिमत्ता आणि क्षमता असूनही केवळ आणि केवळ आत्मविश्वास गमावल्यामुळे काही व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही.
मग मित्रांनो चला तर प्रत्यक्ष उदाहरणच घेऊया- एखादी व्यक्ती विचार करते की- मी हे करू शकेन का? माझ्याकडून हे होईल का? मी या गोष्टीसाठी लायक आहे का? ही भीती आणि मी आणि मीच निश्चित हे करू शकेन हा असलेला आत्मविश्वास यावर सर्व पुढील परिणाम अवलंबून असतात.
मित्रांनो- बऱ्याच वेळा असं होतं की- आपल्या आजूबाजूला काही असेही लोक असतात की ज्यांच्याकडे या आत्मविश्वासाचा प्रचंड साठा असतो! त्यांच्यासाठी आत्मविश्वास कधी असतो तर कधी नसतो हा मुद्दा कधीच येत नाही.
कारण आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टीची ते कधीच दखल घेत नाहीत! त्यामुळे त्यांच्या विचारावर काहीही फरक पडत नाही कारण त्यांचा स्वतःच्या कृतीवर- विचारांवर- क्षमतांवर- निर्णयावर पूर्ण विश्वास असतो! त्यामुळेच आत्मविश्वास हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य असा भाग ठरतो.
त्यामुळे होतं काय मित्रांनो- की मला दिलेले काम मी आणि मी स्वीकारलेल आव्हान हे निश्चितपणे पूर्ण करण्याची क्षमता माझ्याकडे आहे आणि हीच त्यांच्या मनाची सकारात्मक भावना त्यांना ते काम यशस्वी करण्यास उपयोगी ठरू शकते.
कारण त्यांच्यातल्या क्षमतेची त्यांना निश्चितच जाणीव झालेली असते म्हणून हा आत्मविश्वास मिळण्यासाठी तुमचं काम नीट मुळापासून समजून घ्यायला हवं व पुन्हा पुन्हा चेक करून बघायला हव! अरे हो– मी हे निश्चितच करू शकतो हीच भावना मेंदूला वारंवार द्यायला द्यावी.
पण– त्याबरोबरच स्वतःच् अल्पकालीन आणि दीर्घकालीन ध्येय ठरवायला हव! व ह्याबद्दल सुस्पष्टता मनात ही असावीच लागते! हेच आपल्या यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहे! मित्रांनो– खरोखरच एखाद्या प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास जर आपण केला असेल तर आपोआपच आत्मविश्वासाची फळ आपल्याला चाखायला मिळतात! हाच आपल्या चिंतनाचा मुख्य विषय आहे तो आपल्या पर्यंत पोहोचला म्हणून इथेच थांबतो.
( शब्दांकन-ला.डॉ.शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे)