संकल्प ध्येय सिद्धीचा….प्रयत्न करी पूर्तीचा….
आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचं आहे? हा गंभीर प्रश्न सातत्याने आपल्या समोर येतच असतो अर्थात अनेकांना या प्रश्नाच उत्तर सापडत नाही.तर काही जणांना हा प्रश्नच पडत नाही.त्यामुळे ते उत्तरापर्यंत सहजासहजी पोहोचतच नाहीत.
पण- ज्याला खऱ्या अर्थाने आयुष्यात काहीतरी मिळवायच आहे- त्याला मात्र हा निर्णय योग्य वेळी घेतलाच पाहिजे तो असा की– आपल्याला नक्की काय करायचं आहे? आपल्या आयुष्यात आपल्याला काय मिळवायच आहे? आपल्या आयुष्याच ध्येय नक्की काय ठरवायचं आहे? हे काही मूलभूत प्रश्न माणसाला पडायलाच हवेत.
शिवाय हे प्रश्न देखील आपल्या मनात अगदी वेळेत यायलाच हवेत! कारण आपल्याला काय करायचं आहे याच उत्तर आपण योग्य वेळी शोधू शकलो नाही तर मग येणारा काळ मात्र आपल्या बाबतीत तो काळच स्वतः निर्णय घेतो! मग आपण हतबल होतो .
आणि मग तो काळच ठरवेल तसच आपल्यालाही वागावं लागतं! आपली इच्छा नसेल तरी तेच करावं लागतं म्हणूनच काळाच बाहुल होण्यापेक्षा आयुष्याच्या आपल्या ध्येयाच्या बाबतीत स्वतः योग्य निर्णय आणि तेही योग्य वेळी घेतले पाहिजेत एवढेच नव्हे तर एक महत्वाची आवश्यक गोष्ट आहे की या काळात नकारात्मक विचार करणारे आणि तसेच विचार आपल्याही मनात रुजवणारे लोक आपण आपल्या पासून दूर ठेवले पाहिजेत.
कारण मित्रांनो ज्यावेळी आपण आपल्या नवनव्या कल्पना आपणच राबवतो पण– आपल्या दुर्दैवाने त्यावर ते शंकाकुशंका उपस्थित करतात! आपण काही स्वप्न पाहतो त्यावर ते आक्षेप घेत राहतात! आपण नव्या संधीबद्दल बोलतो आणि ते लोक मात्र अडचणींचा डोंगर आपल्यासमोर उभा करतात.
अशा लोकांना तातडीने आपल्यापासून निश्चितपणे दूर ठेवले पाहिजे! कारण अशा लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे आपल्या मनात स्वतःबद्दल निश्चितच शंका उत्पन्न होऊन आपल्या आत्मविश्वासाच खच्चीकरण होऊ शकत! आणि ते आपल्या फायद्याचं कधीच नसतं! म्हणून ज्यामध्ये नकारात्मकता भरलेली आहे असले विचार आपण कधीच ऐकू नयेत उलट योग्य ती कृती करून त्यावर मात करावी आणि आपल्या मौल्यवान आयुष्याचा प्रवास चालू ठेवावा.
मित्रांनो- आजचा हा अत्यंत मोलाचा विषय निश्चितच आपल्या हृदयापर्यंत पोहोचलेला आहे म्हणून मी थांबतो! पुन्हा भेटूया उद्या नवीन विषयासह तोपर्यंत अलविदा! सायोनारा! शब्बा खैर! धन्यवाद!-
( शब्दांकन-ला.डॉ.शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे).
- सांगिसे माध्यमिक विद्यालयात ग्रंथदिंडी उत्साहात संपन्न
- प्रजासत्ताक दिनानिमित्त टाकाऊ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे संकलन
- चांदखेडच्या श्री. समर्थ रघुनाथबाबा पतसंस्थेचा कारभार प्रशासकाच्या हाती
- कडजाई माता क्रिकेट मैदानाची आयोजक प्रशांत भागवत यांच्या कडून पाहणी
- पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी कार्याध्यक्षपदी संगीता शिरसाट यांची निवड