कामशेत:
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पादुका प्रतिष्ठान (ट्रस्ट) आयोजित श्रीक्षेत्र गोवित्री साबळेवाडी फाटा येथे जगद्गुरू श्रीसंत तुकाराम बीज सोहळया निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,या सोहळ्यात  भाविकांनी सहभागी व्हावे असे  आवाहन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पादुका प्रतिष्ठान (ट्रस्ट)चे संस्थापक बाळासाहेब नेवाळे यांनी केले आहे.

बीज उत्सव  सोहळ्या निमित्त  मावळ तालुका मर्यादित भव्य भजन स्पर्धा होणार आहे,या भजन स्पर्धेत तालुक्यातील सर्व भजन मंडळानी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रथम क्रमांक पटकाविणा-या विजेत्या संघास ३१,००० हजार रुपये, द्वितीय क्रमांक व  तृतीय क्रमांक  मिळणा-या  संघास अनुक्रमे रु.२५,०००/- व रु.२०,०००/-रूपये,चतुर्थ,पंचम, षष्ठम क्रमांक , सप्तम  असे सात  क्रमांक या स्पर्धेत काढले जाणार आहे. रोख रक्कम,सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार आहे. जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या संयोजनातून भजन स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेसाठी नियम व अटी असणार आहे,याचे पालन सहभागी संघाना करावे लागणार आहे, एक व्यक्ति एकाच संघात भाग घेता येईल,प्रत्येकाने भजन साहित्य घेऊन येणे, सर्व संघानी ळेवर उपस्थित रहावे,सादरीकरणासाठी १५ मि. राहील,अभंग  क्रमवारी नुसार असावा,परिक्षांचा निर्णय अंतिम मानला जाईल., स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार आयोजक कमिटीस राहिल , संघात कमीत कमी १० सदस्य असावे,अभंग गाथेतील असावा, ५ कि.मी. अंतरातील मंडळास १०००/- रु. मानधन राहिल तसेच ५ कि.मी. अंतरापुढील भजनी मंडळास २०००/- रु. प्रत्येक मानधन देण्यात येईल.

संगीत विशारद ह.भ.प. अरुण महाराज येवले स्पर्धेचे मुख्य परीक्षक असतील. ह.भ.प. योगिराज महाराज गोसावी (पैठण)
शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांचे वंशज,ह.भ.प. माऊली महाराज कदम (छोटे माऊली), (आळंदी),ह.भ.प. महादेव महाराज राऊत (बीड),गुरुवार दि. ०९/०३/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ वा. थोर समाजसेवक, प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे तुकाराम बीजेच्या दिवशी वैकुंठ गमनाचे किर्तन होईल.
शुक्रवार दि. १०/०३/२०१३ रोजी सकाळी ९ से ११ वा. सदगुरु ह.भ.प. अर्जुनसिंग परदेशी बाबा (नगर) यांचे काल्याचे किर्तन होईल

श्री संत तुकाराम महाराज पादुका प्रतिष्ठान (ट्रस्ट) श्री क्षेत्र गोवित्री – साबळेवाडी फाटा, ता. मावळ, जि. पुणे. येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.

error: Content is protected !!