पवना विद्या मंदिर शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी दिलेला शब्द पाळला: सांस्कृतिक सभागृहसाठी आर्थिक मदत
पवनानगर:
पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेला माजी विद्यार्थ्यांचा ओघ सुरु आहे,माजी विद्यार्थी सभागृहसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या भरीव मदतीतून सांस्कृतिक सभागृहाचे काम मार्गी लागणार आहे.

पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेतील मार्च १९७७, मार्च १९८२ मधील मित्र एकत्र येऊन शाळेसाठी मदत दिली.
मागील आठवड्यात माजी विद्यार्थी संघ यांच्या संकल्पनेतून शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त  विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत माजी सभागृहाचे भूमीपूजन संपन्न झाले.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या या सभागृहासाठी भरीव देणगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.त्याच दिलेल्या शब्दानुसार आज प्रत्यक्ष धनादेश संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे सर व पर्यवेक्षिका निला केसकर मॅडम यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी शाळेचे १९७७, १९८२ बॅचचे विद्यार्थी नितीन देशमुख, शरद चाफेकर व कडधे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश कदम सर तसेच शाळेचे जेष्ठ अध्यापक राजकुमार वरघडे, भारत काळे,संजय हुलावळे, गणेश ठोंबरे, गणेश साठे, संतोष ठाकर, बाळासाहेब सातकर,शंकर ढोरे, दिनेश काळे,मनोज खराडे, संजीवन वाघे व इतर उपस्थित होते.

नितीन देशमुख म्हणाले की, आम्ही या शाळेत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले त्यावेळी संपूर्ण पत्र्याच्या शेडमध्ये वर्ग होते परंतु आज शाळेत चांगलाच बदल झाला आहे शाळेच्या सभागृहसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांकडून भरीव मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

error: Content is protected !!