वडगाव मावळ:
सिनेक्राँन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी( हिंजवडी)च्या मार्फत, जांभूळ व सांगवी गावातील जिल्हा परिषद शाळांना मोफत संगणक भेट देण्यात आले.
रफिक नदाफ साहेब असो. डायरेक्टर,राजेश आगळे साहेब ॲडमिन मॅनेजर,ॲडव्होकेट रिहाज तांबोळी, सरपंच नागेश ओव्हाळ, उपसरपंच एकनाथ गाडे, सदस्य अमित ओव्हाळ, सी एस आर विभागाचे सर्व अधिकारी, शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष , सर्व सदस्य व सरपंच, उपसरपंच,  ग्रां.प.सर्व सदस्य व महिला बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ उपस्थित  होते.
जिल्हा परिषद शाळेत संगणक प्रदान सोहळा झाला.
संगणकाच्या माध्यमातून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना योग्य ते माहिती तंत्रज्ञानाविषयी शिक्षण मिळावे व त्यापासून देशाच्या प्रगतीला हातभार लागावा असा मनोदय मनाशी बाळगून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत असे मत सिनेक्रॉन टेकनॉलॉजिस चे मॅनेजर राजेश आगळे यांनी व्यक्त केले.

You missed

error: Content is protected !!