सांगिसे येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचालित माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा ‘बेस्ट स्टुडंट अवाॅर्ड’ देवून गौरव
कामशेत:
सांगिसे, ता मावळ येथील बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित माध्यमिक विद्यालय ,सांगिसे या शाळेतील विद्यार्थ्यांचा जर्मनी येथील डॉ दोरोथी स्माॅल्झ यांच्या वतीने बेस्ट स्टुडंट अवाॅर्ड देवून गौरव करण्यात आला आहे.रोख बक्षीस,सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे अवार्ड चे स्वरूप होते
.सन 2019-20 ते 2021-22 या शैक्षणिक वर्षातील गुणवत्ता,क्रीडा व सामाजिक उपक्रमात विशेष प्राविण्य मिळवलेल्या 27 मुले व 27 मुलांची निवड करून एकूण 54 विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोकुळजी गायकवाड हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दोरोथी स्माॅल्झ, नामदेव शेळके ,संस्थेचे सचिव लहुजी कांबळे ,प्रसाद दहापुते हे होते.तर सरपंच बबनराव टाकळकर ,लहू गायकवाड ,महेश दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
   जर्मनी येथील डॉ दोरोथी स्माॅल्झ यांचे या शाळेच्या स्थापनेपासून  शाळेस मोठे योगदान लाभलेले आहे. यावेळी डॉ दोरोथी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या कि,आम्ही यापुढेही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कार्य करीत राहणार आहोत.तसेच भारतामध्ये व या शाळेकडून मिळालेल्या प्रेमाने मी खूप भारावून गेले आहे व आनंदी आहे.त्याबद्दल आभार व्यक्त केले.तसेच गोकुळ गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास गर्जे यांनी केले तर आभार प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता वंजारी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  ज्ञानेश्वर अरनाळे,अनिल शिंदे,सविता शिंदे,दशरथ ढोरे ,अमोल आल्हाट, दत्तात्रय साबळे,विशाल टाकळकर,अमोल जाधव,स्वप्नाली टाकळकर यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!