पवनानगर : 
आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून तसेच महाले आनंद थर्मल सिस्टिम चाकण यांच्या सी.एस.आर फंडातून व एस.एन.एस फाऊंडेशन यांच्या सहकार्यातून बौर येथील ब्राह्मण वाडी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला १८ लाख रुपयांचा निधी देण्यात आला.
या निधीतून विद्यार्थ्यांसाठी एक वर्ग खोली व मुला मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधण्यात आले. तसेच वर्गाचे उद्घाटन महाले आनंद थर्मल सिस्टिम कंपनीचे मानव संसाधन अधिकारी मनोज शर्मा यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेशभाऊ वाळुंजकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष वाळुंजकर,उपाध्यक्ष श्री. नारायण कंक,राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक श्री.सतिशभाऊ वाळुंजकर,सोमाटणे गावचे सदस्य नितीन मुर्हे माजी सरपंच अंकुश म्हस्के,ग्रामस्थ मारुती महाराज म्हस्के सुभाष म्हस्के, देवदास म्हस्के,खंडू चव्हाण, लहू म्हस्के,माधुरी गराडे,पूजा मस्के,शुभांगी म्हस्के, अंगणवाडी शिक्षिका दाभाडे मॅडम,भविका मॅडम, शारदा मॅडम तसेच माता पालकसंघ व शिक्षक पालक संघ पदाधिकारी महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक मुख्याध्यापक तानाजी शेखरे सर यांनी केले तर पदवीधर शिक्षिका रोळे मॅडम, राऊत सर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!