श्रीक्षेत्र देहूगाव:
राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,देहू शहर यांच्या वतीने देहुतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह येथील अनाथ व गरजू विद्यार्थिनींना स्वेटर वाटप  केले.
देहूच्या नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष, नगरसेवक,नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्येष्ठ नेते,सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम  संपन्न झाला.
सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व संत जिजाबाई कन्या विद्यालय येथील मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वृंद यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
  लोकनेते शरद पवार यांच्या आयुष्यातील अनेक घटनांना उजाळा देण्यात आला.ऐन थंडीत ऊबदार कपडे मिळाल्याने विद्यार्थ्यांनीच्या चेहर्‍यावर  आनंद ओसंडून वाहत होता. देहू शहर अध्यक्ष विकास कंद व कार्याध्यक्ष सोमनाथ चव्हाण यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
  

error: Content is protected !!