तळेगाव दाभाडे:
ज्या पायाने मला कमांडो बनवलं तेच पाय मी गमावलं. पण मी हरलो नाही अन खचलो ही नाही..मला देशासाठी धावायचं आणि जिंकायचं..असा विश्वास कमांडो  मेजर रामदास भोगडे  यांना आहे.

तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफच्या चार दिव्यांग  कमांडो बांधवाना खांडगे हिरोच्या दालनात हिरो मोटोकाॅप च्या वतीने दुचाकी गाडी भेट देण्यात आली .त्या वेळी कमांडो बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या छोटेखानी समारंभास  मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे, सौ.अनुपमा गणेश खांडगे,सुभेदार मेजर  टी.आर. चौधरी , हवालदार अनिल कोलते,
हिरो मोटोकॉपचे पंकज  खोडे,  सुहास गरूड, सत्यम खांडगे उपस्थित होते.

मेजर रामदास भोगडे, मेजर अजिनाथ शिरसाठ , मेजर शंकर वरकट , मेजर जनार्दन सोनवणे  या दिव्यांग कमांडो बांधवाना ‘हिरो डेस्टनी १२५’ या खास दिव्यांग बांधवांसाठी बनवलेल्या दुचाकी भेट आल्या.

सत्यम खांडगे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. विकी कुडाळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रगती आगळे यांनी वाहनाविषयी माहिती दिली.सुहास गरूड यांनी आभार मानले.

error: Content is protected !!