घरातील ज्येष्ठांशी संवादाद्वारे जवळीक साधण्याची मोहीम म्हणजे “ऐका स्वाभिमानाने”: नगरसेवक डाॅ. नील सोमय्या
सवलतीच्या दरात श्रवणयंत्र वाटप – वडगांव शहर भारतीय जनता पार्टी व युवक प्रतिष्ठान यांचा संयुक्त उपक्रम
४५५ नागरिकांनी घेतला लाभ
वडगाव मावळ:
वडगांव शहर भारतीय जनता पार्टी व युवक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नगरसेवक भूषण मुथा यांच्या संकल्पनेतुन सवलतीच्या दरात श्रवणयंत्र वाटप या उपक्रमाचे उदघाटन वडगांव मावळ मुलुंड येथील नगरसेवक डॉ.नील सोमय्या यांच्या हस्ते आणि मावळ भाजपा प्रभारी भास्करराव  म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली तर मावळ भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

याप्रसंगी बोलताना नगरसेवक डाॅ. नील सोमय्या यांनी ज्येष्ठ नागरीकांमधील श्रवणदोष दूर झाल्यास सुसंवाद सहजसाध्य होईल या विचारातून आपले वडील मा.खासदार डॉ.किरीटजी सोमय्या यांना माफक दरात श्रवणयंत्र ही संकल्पना सुचल्याचे सांगीतले.

मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अनेक छोट्या मोठ्या जनहिताच्या उपक्रमांद्वारे वडगांव शहर भाजपा कार्यकर्ते, संपूर्ण तालुक्यात पक्षाची ताकद वाढविण्याचे काम करीत असल्याचे मनोगत व्यक्त केले.

तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी असे उपक्रम मावळ तालुक्यात विविध ठिकाणी घेण्यात येतील असे सांगितले व या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक मा.नगरसेवक भूषण मुथा यांनी केले ज्यामध्ये त्यांनी युवक प्रतिष्ठान यांना धन्यवाद देतानाच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी देणारी एकमेव राजकीय पार्टी अशा शब्दांत भाजपाप्रती ऋण व्यक्त केले.

यावेळी श्री.पोटोबा देवस्थान संस्थान चे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते अरविंद पिंगळे, अ‍ॅड.तुकाराम काटे, किसनराव भेगडे, मधुकर वाघवले, वडगांव विविध कार्यकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन पंढरीनाथ भिलारे, सोमनाथ काळे, दीपक बवरे,डॉ.सुनील बाफना,  मा.सभापती रेवतीताई वाघवले, मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर, मा.उपसभापती , नगरसेवक प्रविण चव्हाण, पवना कृषक सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव घारे, वसंतराव भिलारे, लहुशेठ भिलारे, केवलचंद ओसवाल, नंदकुमार दंडेल, बाळासाहेब भालेकर,
संघटनमंत्री किरण भिलारे , सरचिटणीस मकरंद बवरे, गटनेते व नगरसेवक दिनेश ढोरे, नगरसेवक अ‍ॅड. विजयराव जाधव, किरण म्हाळसकर, खंडूशेठ भिलारे, शरद मोरे, रवींद्र म्हाळसकर, शामराव ढोरे, रविंद्र काकडे, श्रीधर चव्हाण, शंकरराव भोंडवे , गणेश भालेकर, आप्पासाहेब वाघवले, गणेश भेगडे, मा.सरपंच नितीन कुडे, संभाजीराव म्हाळसकर, सुधाकरराव ढोरे, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, नाथा घुले, नामदेव भसे, रमेश ढोरे, संजय जानेराव, दीपक भालेराव, योगेश म्हाळसकर, नामदेव वारींगे, रोहिदास गायकवाड, संतोष म्हाळसकर,  अमोल खोल्लम, हरीश दानवे, नितीन गाडे, अतुल म्हाळसकर, कुलदीप ढोरे, प्रशांत चव्हाण,  प्रज्योत म्हाळसकर, महेंद्र बा. म्हाळसकर , शेखर वहिले, समीर गुरव, महेंद्र अ. म्हाळसकर , अरुण सुळके, संतोष भालेराव, अनिकेत सोनवणे, शिवा कटनाईक, आदी उपस्थित होते.,

४५५ नागरिकांनी या शिबिराचा घेतला लाभ असून या सर्वांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. श्रवणयंत्र घेतलेल्या सर्व नागरीकांच्या चेह-यावर समाधान दिसत होते. अनेकांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या.स्वागत भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी केले. सूत्रसंचालन सरचिटणीस कल्पेश भोंडवे यांनी केले. आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष, मा.नगरसेवक प्रसाद पिंगळे यांनी केले.

error: Content is protected !!