पवनानगर :
काले-पवनानगर  ग्रामपंचायतीच्या
उपसरपंचपदी रंजना दत्तात्रय कालेकर यांची निवड
कालेच्या उपसरपंच आशा कालेकर यांनी ठरलेल्या मुदतीत राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सरपंच खंडुजी कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत रंजना कालेकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सरपंच खंडू कालेकर व ग्रामसेवक रविंद्र  वाडेकर ग्रामपंचायत सदस्य अमित कुंभार , प्रवीण घरदाळे, उत्तम चव्हाण , रमेश कालेकर,छाया कालेकर, योगिता मोहोळ,आशा कालेकर आदी सदस्य उपस्थित होते  दत्ता कालेकर , पप्पू शेडगे ,बबन कालेकर , चंद्रकांत आढाव , सचिन साबळे, गोविंद कालेकर , दत्ता कालेकर पाटील , संतोष राऊत , स्वप्नील सावंत , शरद कालेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते

निवडीनंतर गुलाल भंडाऱ्याची उधळण करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

You missed

error: Content is protected !!